मुक्तपीठ टीम
कारमध्ये ६ एअरबॅग सुविधा आणण्यासाठी सरकार पावलं उचलत आहे. परंतु, याबाबत अजून सरकार आणि कार उत्पादकांमध्ये एकमत झालेलं नाही. मात्र, सरकारने ६ एअरबॅग्सबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी एक व्हिडीओ तयार केला आहे. चित्रपट अभिनेता अक्षय कुमारचा हा व्हिडीओ जबरदस्त व्हायरल होत आहे.
वडिलांनी मुलीला ६ एअरबॅग असलेली कार दिली नाही, अक्षय कुमारने कसे समजावले?
- ६ एअरबॅगसाठी बनवलेल्या टीव्हीची जाहिरातीत अक्षय कुमार एका ट्रॅफिक पोलिसाच्या भूमिकेत आहे.
- ही जाहिरात एका मुलीची पाठवणी करतानाची आहे. ज्यामध्ये मुलगी तिच्या वडिलांनी भेट दिलेल्या कारमध्ये बसून रडत आहे.
- यावेळी अक्षय कुमार येतो आणि तो तिच्या वडिलांना सांगतो की या कारमध्ये ६ एअरबॅग नाहीत. अशा परिस्थितीत मुलगी रडणार नाही तर हसणार का?
- यानंतर वडील तिला ६ एअरबॅग असलेली कार भेट देतात आणि मुलगी हसायला लागते.
- मजेशीर पद्धतीने बनवलेली ही जाहिरात लोकांच्या हृदयाला भिडते.
- जाहिरातीच्या मध्यभागी असलेल्या ग्राफिकच्या मदतीने अपघाताच्या वेळी ६ एअरबॅग्जचे महत्त्व देखील स्पष्ट केले आहे.
भारताच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. ही जाहिरात त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर करताना केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लिहिले की, ‘६ एअरबॅग असलेल्या या वाहनात प्रवास करून जीवन सुरक्षित करा.’ एअरबॅगची किंमत फक्त ८०० रुपये आहे. सरकार ६ एअरबॅगच्या प्रस्तावावर विचार करत आहे. त्याची अंमलबजावणीही लवकरच होणार आहे.