मुक्तपीठ टीम
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर अनेक राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत. दरम्यान भाजपाला धक्का देत अनेक बडे नेते भाजपा सोडून समाजवादी पक्षात प्रवेश करत आहेत. अखिलेश यादव यांनी कमळ सोडा, सायकलवर बसा, सपाची उमेदवारी मिळवा असे आवाहन केले आहे. सपा-आरएलडी युतीने आपल्या पहिल्या यादीद्वारे पक्षांतर करणाऱ्यांना संदेश दिला आहे. जर तुम्ही मजबूत आहात आणि तुमच्यासोबत जनमत आहे तर तुम्हाला तिकीट मिळू शकते. या यादीत आतापर्यंत सहा पक्षांतर केलेल्या नेत्यांना तिकीट मिळाले आहे. त्यापैकी दोन विद्यमान आमदार आहेत. आतापर्यंत केवळ २९ जागांची यादी जाहीर झाली आहे. शुक्रवारी आणखी नावांची यादी जाहीर होईल.
बसपाच्या अस्लम चौधरींचा धौलानामधून विजय झाला आहे. सपाने त्यांना येथून उमेदवारी दिली आहे. भाजपमधून आरएलडीमध्ये आलेले आमदार अवतार सिंह भडाना हे चार वेळा खासदार राहिलेत. हरियाणातही त्यांचा चांगला प्रभाव आहे. ते आता आरएलडीचे उमेदवार आहेत. काँग्रेस सोडून आरएलडीमध्ये दाखल झालेले गजराज सिंहनाही उमेदवारी जाहीर झाली आहे. गजराज सिंह हापूरमधून चार वेळा निवडणूक जिंकले आहेत.
आरएलडीमध्ये बसपा सोडून गेलेल्या नेत्यांना पसंती
- बसपा सोडून हाजी युनूसही आरएलडीचे बुलंदशहरमधून उमेदवार झाले आहेत.
- उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या कोकाब हमीद यांचा मुलगा अहमद हमीद यांना आरएलडीने बागपतमधून उमेदवारी दिली आहे.
- त्यांनी बागपतमधूनच बसपाकडून मागची निवडणूक लढवली होती.
- कोकब हमीद अनेक वेळा बागपतमधून आमदार होते.
- आघाडीच्या यादीत सर्व जातीय समीकरणे लक्षात घेतली, तर कमी-अधिक प्रमाणात सर्वच वर्ग जुळवून घेतले गेलेत.
- यात जाट, गुज्जर आहेत. तसेच ब्राह्मण, क्षत्रिय, मागास आणि दलितवर्गाचाही समावेश आहे.
धर्मेंद्र मलिक यांनी अखिलेश यांची घेतली भेट
- भारतीय किसान युनियन पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा डावपेच बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे.
- बीकेयू प्रमुख महेंद्रसिंग टिकैत यांचे निकटवर्तीय धर्मेंद्र मलिक यांनी लखनऊमध्ये अखिलेश यादव यांची भेट घेतली.
बीकेयू ही बिगर राजकीय संघटना आहे. - धर्मेंद्र मलिक आणि इतर काहींना पश्चिम उत्तर प्रदेशातून आरएलडी किंवा सपाकडून तिकीट मिळू शकते, असे मानले जात आहे.