Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“कुत्रे, मांजर, कोंबड्यांचे प्रतिनिधित्व करत नाही, हे आमदारांनी लक्षात ठेवावं!”

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आमदारांना कानपिचक्या

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ajit pawar

मुक्तपीठ टीम

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या फटकळपणासाठी ओळखले जातात. विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी त्यांनी चित्रविचित्र वागणाऱ्या बोलणाऱ्या आमदारांना चांगलंच सुनावलं. ते म्हणालेत, पूर्वी विधिमंडळाचे कामकाज लाईव्ह होत नव्हते. परंतु आता दोन्ही सभागृहाचे कामकाज लाईव्ह होते. राज्य आणि माध्यमे आपल्याकडे पहात आहेत. त्यामुळे आमदारांनी संसदीय शिष्टाचाराचे पालन केले पाहिजे. आमदारांना २-२ लाख मतदार मतदान करुन विधानसभेत पाठवत असतात. आमदारांनी त्यांचे प्रतिनिधीत्व केले पाहिजे. कुत्रे, मांजर, कोंबड्या या प्राण्यांचे प्रतिनिधित्व आपण करत नाही हे सर्वांनी ध्यानात ठेवावे.

 

अजित पवारांचे शिस्तीचे डोस

  • मधुकरराव चौधरी अध्यक्ष असताना आम्ही आमदार होतो. तेव्हा केवढा दरारा असायचा.
  • ते उभे असतील तर आम्ही ओलांडून जायचो नाही.
  • आता तर आमच्या जागेवर कोणीही येऊन बसतो.
  • मुख्यमंत्र्यांच्य खुर्चीवरही येऊन बसतात.
  • त्यांना म्हटलं तेवढी तरी राहू दे. तुला १४५ आमदारांचा पाठिंबा मिळाला तर बस.
  • पण तरीही आमदार काही ऐकत नाहीत.

 

अध्यक्षपदाचा सन्मान, सभागृहातील वागणं!

  • अध्यक्षांना पाठ दाखवायची नसते.
  • पूर्वी कॅबिनेटमंत्री पुढे बसायचे. आम्ही पाठी बसून त्यांच्याशी बोलायचो.
  • त्यांना सभागृहात डिस्टर्ब करायचो नाही.
  • आता एक पत्र दिल्यावर दहा मिनिटाने दुसरं पत्रं देतात. अरे एकदाच काय द्यायचं ते द्या ना बाबा.
  • सर्वांनी शिस्त पाळावी. एकमेकाला ओलांडण्याचे तर कुणाला कळत नाही. कोण कुठं उभं आहे, काय आहे, हेच माहीत नसते.
  • कसंही ओलांडलं जातं.
  • तिथं तर बऱ्याचदा बोलत असतात. इथं कोणतरी बोलत असतात.
  • सभागृहात आल्यावर अध्यक्षांना नमस्कार करून बसायचे असते. जातानाही नमस्कार करायचा असतो. एवढी साधी गोष्टही त्यांना कळत नाही.

सभागृहाच्या प्रतिमेला तडा!

विधिमंडळ सर्वोच्च असून इतक्या वर्षांच्या सभागृहाच्या प्रदीर्घ वाटचालीत विधिमंडळाने उच्च मूल्य प्रस्थापित केले आहेत.
त्यामुळे प्रत्येक आमदाराने आदर्श आचारसंहितेचे पालन करत जबाबदारीने वागले पाहिजे. विधानसभेत आमदार निवडून आल्यानंतर तो सार्वजनिक जीवनात कसा वागतो? सभागृहात कसे वर्तन करतो? यावरुन त्याची प्रतिमा ठरत असते. काही सदस्यांच्या चुकीच्या वर्तणुकीमुळे सभागृहाच्या प्रतिमेला नक्कीच तडा गेला आहे‌. आता सर्वांनीच अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे.


Tags: ajit pawarMaharashtramaharashtra assembly sessionअजित पवारविधिमंडळ अधिवेशन
Previous Post

Corbevax: दुसऱ्या भारतीय लसीला मान्यता! या कोरोना लसीमध्ये वेगळं असं काय आहे?

Next Post

सर्वोच्च नौदल पदक मिळवलेल्या रिअर ऍडमिरल समीर सक्सेना यांनी फ्लीट कमांडरची जबाबदारी स्वीकारली

Next Post
admiral sameer saxena

सर्वोच्च नौदल पदक मिळवलेल्या रिअर ऍडमिरल समीर सक्सेना यांनी फ्लीट कमांडरची जबाबदारी स्वीकारली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!