मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वाढत प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रतिबंधक लसच प्रभावी ठरत आहे. पण लसीचा तुतवडा निर्माण होत असल्याने बरीच लसीकरण केंद्र बंद पडली आहेत. याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र दिनी माध्यामाशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावाला यांना त्यांचा लसनिर्मिती प्रकल्प पुण्यात म्हणजेच महाराष्ट्रात असल्याची आठवण करुन दिली आहे. त्यांनी म्हटले की, “सध्याची परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र आणि देशासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे होती. लसीचा प्लांट आपल्या पुण्यात असल्याने, आपल्या इथे अधिक लस कशी मिळेल यासाठी प्रयत्न झाले पाहिजे होते.”
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने विधान भवन येथे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ध्वजारोहण केले. त्यानंतर प्रसार माध्यमांसोबत बोलताना राज्यातील अनेक प्रश्नांवर त्यांनी भूमिका मांडली. तसेच लस देण्याचे पूर्ण अधिकार केंद्राने हाती घेतले आहेत. तरीही राज्य सरकार भारत बायोटेककडे अधिक लस कशा मिळतील यासाठी प्रयत्न करत आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.
“राज्याला अधिक लस मिळाली पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावाला यांच्याशी चर्चा केली. त्या चर्चेदरम्यान निश्चित लसीचा जास्तीत जास्त पुरवठा केला जाईल असे सीरमकडून त्यावेळी सांगितले गेले. मात्र नंतर एवढा पुरवठा करणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सुरुवातीला तयार होणारी लस दुसऱ्या देशांना देण्याची गरज नव्हती त्यामुळे आपल्याला लसींची कमतरता भासल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.