मुक्तपीठ टीम
राज्यात गेल्या काही दिवसांत सातत्याने महिला अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. यामध्ये आता औरंगाबादच्या पदमपुरा कोरोना केअर सेंटरमध्ये कोरोनाबाधित महिलेवर डॉक्टरकडून अतिप्रसंगाचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर रुग्णांच्या संतप्त नातेवाईकांनी रूग्णालयात घुसून डॉक्टरला बेदम मारहाण केली. जळगावातला वाद ताजा असतानाचं आता विधीमंडळात याप्रकरणावर वाद होत आहेत. विरोध पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला अजून किती बलात्कार आणि किती विनयभंग पाहिजे, असा संतप्त सवाल सरकारला केला आहे. मात्र, यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगळीच प्रतिक्रिया दिली आहे.
फडणवीस म्हणाले, तुम्हाला अजून किती बलात्कार आणि विनयभंग पाहिजेत. कोणतीही सुरक्षा पुरवली जात नाही. कोणतीही एसओपी नाही. या घटनेची तातडीनं माहिती द्या, असं म्हणत फडवणवीसांनी सरकारला जाब विचारला. यावर उत्तर देताना तिथे बलात्कार झालेला नाही, असं उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पवार म्हणाले, औरंगाबादच्या रुग्णालयात दाखल भगिनीच्यासंदर्भात घडलेली विनयभंगाच्या प्रयत्नाची घटना दुर्दैवी आहे. संबंधित भगिनीवर बलात्कार झालेला नाही. मात्र, विनयभंगाचा प्रयत्न होणे हे देखील वाईट कृत्य आहे. सरकारने ही संपूर्ण घटना गांभीर्याने घेतली आहे. याप्रकरणाची प्राथमिक चौकशी स्थानिक महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली आहे. महिलेने कोणतीही तक्रार केलेली नाही. महिलेचा पती आणि संबंधित डॉक्टर मित्र आहेत. मात्र,संबंधित डॉक्टरला बडतर्फ करण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं. पवार यांच्या या विधानामुळं प्रकरणाला आता वळण आलं आहे.
दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मनपा आयुक्त पांडे यांनी दिले आहेत. राज्यातील कोरोना सेंटरमध्ये महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत एसओपी तयार करुन लागू करण्यात येईल. ही एसओपी राज्यातील सर्व कोरोना सेंटरसाठी बंधनकारक असेल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. औरंगाबाद शहरातल्या रुग्णालयात डॉक्टरकडून महिलेचा विनयभंग झाल्याचा मुद्दा विधीमंडळात उपस्थित करण्यात आला होता. त्यावर बोलताना अजित पवार यांनी याबद्दल माहिती दिली. “