Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

विरोधकांना कामधंदा नसल्याने जुन्या गोष्टी उकरून काढतात!

अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ajit pawar (2)

मुक्तपीठ टीम

महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेला यावर्षी २ वर्ष पूर्ण होतील. मात्र अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित सरकार स्थापनेचा घेतलेला निर्णय, शपथविधीचा तो दिवस आणि अजित पवारांची माघार हे भाजपाच्या चांगलाच वर्मी लागल्याचं दिसतंय. अजित पवार यांच्यासोबत सत्ता स्थापन करणं ही चूक होती, अशी कबुली विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. अजितदादांना सत्ता स्थापन करता येते, पण टिकवता येत नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. आता त्यावर पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पलटवार केला आहे. विरोधकांना काही कामधंदा नाही. त्यामुळे ते ती गोष्ट उकरून काढत आहेत, अशा शब्दात अजित पवार यांनी टीका केली आहे.

 

कामधंदा नसल्याने जुन्या गोष्टी उकरतात…

  • त्या गोष्टीला आता १४ महिने झाले आहेत. तरीही मागची गोष्ट उकरून काढत आहेत.
  • ज्यांना काही काम नाही ते लोकं या गोष्टीवर बोलत आहेत.
  • आज आनंदाचे वातावरण आहे. त्याकडे लक्ष द्या.

 

बॉम्बची भाषा करणाऱ्या नरेंद्र पाटलांवरही अजित पवारांची टीका

  • काही लोक भावनेच्या आहारी जाऊन काहीही बोलतात.
  • कायदा आणि संविधान काही बघत नाहीत.
  • अशा वक्तव्यांमुळे निर्माण झालेल्या बातम्या उचलून धरल्या जातात.
  • ही लोकं एकेकाळी आमच्याबरोबर होती. त्यांचा अवाका आम्हाला माहीत आहे.
  • शरद पवारही या लोकांना ओळखून आहेत. आम्हीच त्यांना आमदार केलं होतं. त्यामुळे त्यांना महत्त्व द्यायचं नाही.

 

मराठा आरक्षणावरून पुनर्विलोकन याचिकेसाठी प्रयत्न

  • मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
  • आपल्या न्याय व्यवस्थेत पुनर्विचार याचिका दाखल करण्याची संधी आहे.
  • त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत.
  • सर्वोच्च न्यायालयाच्या ५ न्यायमूर्तींच्या खंडपीठाने निकाल दिला आहे. हा निकाल नीट वाचा. जवळच्या वकिलांना विचारा. त्यात कोर्टाने गायकवाड कमिशनवरच प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहेत.
  • काही लोक आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजाला भडकावण्याचं काम करत आहेत.
  • पण कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे.
  • त्यासाठी आम्ही राज्यपालांना भेटलो. आणखी वरिष्ठ नेत्यांना भेटायचं आहे. लवकरच भेटणार आहोत.

Tags: ajit pawarBJPchandrakant patildevendra fadanvisMVAअजित पवारचंद्रकांत पाटीलदेवेंद्र फडणवीसभाजपमहाविकास आघाडी
Previous Post

योगींवर मोदी, शाह नाराज असल्याची चर्चा!

Next Post

वूहान लॅबमधूनच पसरला कोरोना विषाणू! महाराष्ट्रातून चीनची पोलखोल!

Next Post
Pune Scientists couple Wuhan corona

वूहान लॅबमधूनच पसरला कोरोना विषाणू! महाराष्ट्रातून चीनची पोलखोल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!