मुक्तपीठ टीम
लोकप्रिय अभिनेता अजय देवगण हा नेहमीच आपल्या भूमिकेमुळे चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून अजय देवगण डिजिटल डेब्यू करणार असल्याच्या चर्चां होत होत्या. पण आता या चर्चांना पूर्णविराम लागला असून अजय लवकरच हॉटस्टार स्पेशल्सच्या क्राइम ड्रामा सिरीजमधून आपल्या डिजिटल कारकिर्दीला सुरुवात करणार आहे. ‘रुद्र-द एज ऑफ डार्कनेस’ असे या सिरीजचे नाव आहे. यात अजय एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका निभावणार आहे, जी आतापर्यंत साकारण्यात आलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी असू शकते.
‘रुद्र-द एज ऑफ डार्कनेस’ याची निर्मिती एप्लॉज इंटरटेनमेंट आणि बीबीसी स्टूडिओ मिळून करत आहेत. तसेच या सिरीजची शूटींग लवकरच मुंबईत सुरू होणार आहे.
डिजिटल डेब्यू बद्दल अजय देवगण म्हणाला की, “माझा नेहमी प्रयत्न असतो की चांगल्या लोकांसोबत काम करणे. ‘रुद्र-द एज ऑफ डार्कनेस’ ही एक प्रेक्षकांना त्या भोवती खेळवून ठेवणारी सिरीज आहे. पोलिसांची भूमिका साकारणे माझ्यासाठी नवीन नाही. पण यावेळी हे पात्र खूपच कठीण आहे”.
ब्रिटिश सिरीजचा रिमेक
- ‘रुद्र-द एज ऑफ डार्कनेस’ हि सिरीजची कथा ब्रिटिश सायकोलॉजिकल क्राइम ड्रामा “ल्यूथर”चा भारतीय रिमेक आहे.
- नील क्रॉस क्रिएटेड सिरीजमध्ये इडलिस एल्बाने डीसीआय जॉन ल्यूथरची भूमिका बजावली होती.
- २०१० ते २०१९ मध्ये याच्या पाच सिरीज आल्या आहेत.