मुक्तपीठ टीम
मोबाईल फोन वापरणं ही आजकालच्या काळाची गरज झाली आहे. त्यातच आता दैनंदिन आयुष्यात आपल्याला मोबाईलमध्ये इंटरनेट सेवा वापरणे आवश्यक झाले आहे. एकीकडे मोबाइल डेटा वापराची निकड वाढत असतानाच आता तो डेटाही महाग होऊ लागला आहे. एअरटेल कंपनी आपले प्रिपेड प्लॅन्समध्ये वाढ करत आहे. २६ नोव्हेंबरपासून एअरटेल प्लॅन्स मध्ये २० रुपयांपासून ते ५०१ रुपयांपर्यंत वाढ होणार आहे.
एअरटेलची सेवा महागली…
- एअरटेल ने २८ दिवसांच्या वैधतेच्या पलॅन मध्ये २० ते ६० रुपयांची वाढ केली आहे.
- 56 दिवसांच्या वैधतेचा प्लॅन ८० ते १०० रुपयांनी महागला आहे.
- 84 दिवसांच्या वैधतेच्या प्लॅनसाठी आता १२० ते १४० रुपये जास्त मोजावे लागतील.
- डाटा अॅडऑन प्लॅनमध्ये देखील १० ते ५०रुपयांची वाढ करणार असल्याचे एअरटेलने जाहीर केले आहे.
अनेक दिवस तोटा सहन करत असलेल्या एअरटेल कंपनीला या गोष्टीचा फायदा होणार असल्याचं मत तज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. याशिवाय एअरटेल कंपनींकडून पुरवल्या जाणाऱ्या सेवांच्या मोबदल्यात वाढीव किंमत योग्य आणि सर्वसामान्यांना परवडणारी असल्याचं एअरटेल कंपनीने सांगितल आहे.
मात्र, एअरटेलने घेतलेल्या या निर्णयानंतर आता आइडिया, वोडाफोन आणि जियो देखील आपल्या प्लानच्या किंमतीत वाढ करू शकतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र अद्याप या कंपन्यांकडून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.