Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोनात अनाथ विद्यार्थ्यांची १०वी व १२वी ची परीक्षा माफ करण्याची मागणी

September 6, 2026
in व्हा अभिव्यक्त!
0
exam

हेरंब कुलकर्णीं/ व्हा अभिव्यक्त!

कोरोना महामारीच्या दोन लाटांमध्ये हजारोंचे प्राण गेले आणि त्यात शेकडो मुलांनी आपल्या आई-वडिलांना गमावलं. कोरोना संकटात अनाथ झालेल्या अशा मुलांपैकी शिकणाऱ्या मुलांची अवस्था अधिकच वाईटच झाली आहे. अशा अनाथ विद्यार्थ्यांपैकी १०वी व १२वी ची परीक्षा माफ करण्याची मागणी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना खुले विनंती पत्र लिहिले आहे.

कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राज्य निमंत्रक म्हणून लिहिलेल्या या पत्रात त्यांनी ना. गायकवाडांचे कोरोना अनाथ विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधले आहे.

 

हेरंब कुलकर्णींचे शिक्षण मंत्र्यांना लिहिलेले खुले पत्र जसं आहे तसं:

मा. वर्षा गायकवाड
शालेय शिक्षण मंत्री
महाराष्ट्र

विषय: १) १० वी व १२वी च्या बोर्डाच्या परीक्षेसाठी कोरोनात पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची फी माफ करून त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर आर्थिक मदत करणेबाबत

महोदय,

सध्या १०वी व १२वी च्या बोर्डाच्या परीक्षेचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.कोरोनात महाराष्ट्रात मृत्यू झालेल्या कुटुंबाची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. दवाखान्याच्या खर्चाने अनेक कुटुंबे कर्जबाजारी झाली व असंघटित क्षेत्रातील गरीब कुटुंबांची ही संख्या लक्षणीय आहे. यासाठी किमान या कुटुंबातील विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा फी माफ करावी ही विनंती

शिक्षण विभागाने  कोरोनात पालक गमावलेल्या १ली ते १२वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची माहिती संकलित केली असून ती संख्या सरकारकडे आहे. या विद्यार्थ्यांची सरकारने फी त्वरित माफ करावी.

त्याच बरोबर १ली ते वी ८ वी पर्यंतच शालेय पोषण आहार, गणवेश व मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात.९ वी ते १२ वी ला या योजनांचा लाभ मिळत नसल्याने ९वी ते१२वी  पर्यंत शिक्षणाचा खर्च खूप वाढतो.हा खर्च करणे विधवा महिलांना खूप कठीण होते आहे. महाग पाठ्यपुस्तके स्वतः खरेदी करावी लागतात. अशा विधवा महिलांच्या मुलांना शालेय इतर खर्चासाठी विशिष्ट रक्कम  प्रोत्साहनपर म्हणून देण्याची आवश्यकता आहे. त्यातून हे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहतील.

कठीण आर्थिक स्थितीमुळे अशा कुटुंबातील मुले बालमजुरीकडे वळली आहेत व अनेक मुली बालविवाहाला बळी पडल्या आहेत. त्यामुळे नववी ते बारावीच्या इयत्तेतील विद्यार्थी विद्यार्थिनी प्रवाहात टिकून राहण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज वाटते.

सर्वच एकल व विधवा महिलांच्या मुलांसाठी शासनाने असा दृष्टिकोन घ्यायला हवा व फी माफी व प्रोत्साहनपर मदत घ्यावी अशी आमची मागणी आहे.

यापूर्वीच १४ नोव्हेंबर रोजी बाल दिनानिमित्त राज्यात पहिली ते बारावीच्या २५,००० विद्यार्थ्यांनी पालक गमावले त्यांच्यासाठी स्वतंत्र शिष्यवृत्ती जाहीर करावी अशी मागणी आम्ही तुम्हाला पत्र लिहून केली आहे. त्याचाही आपण विचार कराल ही खात्री आहे

आपले नम्र
हेरंब कुलकर्णी
राज्य निमंत्रक
कोरोना एकल पुनर्वसन समिती महाराष्ट्र

heramb kulkarni

(हेरंब कुलकर्णी हे कोरोना एकल पुनर्वसन समितीचे राज्य निमंत्रक आहेत.)


Tags: coronaHeramb Kulkarnivarsha gaikwadकोरोनावर्षा गायकवाडहेरंब कुलकर्णी
Previous Post

…तर मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे पॅरोलवरील आरोपीसोबत बॅनरवर फोटो छापणार का?

Next Post

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, आता मोबाइल डेटाही महागला!

Next Post
airtel

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, आता मोबाइल डेटाही महागला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!