मुक्तपीठ टीम
भारतीय वायू सेनेने श्रीनगरमध्ये एअर शो आयोजित केला होता. यामध्ये, स्काय डायव्हिंग टीम आकाशगंगा, सूर्यकिरण अॅरोबॅटिक आणि डिस्प्ले टीमने डल तलावावर स्कायडायव्हिंगसारखे हवाई पराक्रम केले. पॅरामोटर फ्लाइंग हे देखील कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते. हा कार्यक्रम दाल सरोवराच्या परिसरात 13 वर्षानंतर झाला. या कार्यक्रमात हवाई दलाच्या सिम्फोनिक ऑर्केस्ट्राने ही यात सहभाग घेतला होता.
श्रीनगर हवाई दल स्टेशन आणि जम्मू -काश्मीर प्रशासनाने ‘आझादी का अमृत महोत्सव’ या समारंभाचा भाग म्हणून एअर शो आयोजित केला होता. असे आयएएफच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार समजले. ‘गिव विंग्स टू यॉर ड्रीम’ म्हणजेच तुमच्या स्वप्नांना पंख द्या अशी या एअर शोची थीम होती. या कार्यक्रमाची हेतू येथील खोऱ्यातील तरुणांना हवाई दलात सामील होण्यासाठी आणि पर्यटनाला प्रोत्साहन देणे हा आहे.
जम्मू-काश्मीरमधील शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये या एअर शोचे आयोजन करण्यात आले होते. लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा, वेस्टर्न एअर कमांडचे ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ बी.आर कृष्णा यांच्यासह अनेक प्रमुख अधिकारी यात सहभागी झाले होते.