मुक्तपीठ टीम
कोरोनाची दुसरी लाट मंदावत असतानाच लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले जात आहेत. देशोदेशीच्या विमान प्रवासावरील निर्बंधही हटवले जात आहेत. लॉकडाउनमुळे प्रवासावर अनेक निर्बंध असल्यामुळे सामान्य प्रवाशांना परदेशी प्रवास करायचं तर संकटच वाटत होते. त्यामुळे आता नियम शिथिल झाल्यानंतर प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रवाशांनी विमानप्रवासास सुरुवात केली आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये विमान प्रवाशांची संख्या ३६ टक्क्यांनी वाढली आहे.
उलाढाल वाढली, भाडे घटले, प्रवाशी वाढले!
- मार्च २०२०पासून सुरु झालेल्या लॉकडाउनमुळे विमान प्रवासात घट झाल्याचे दिसून आले.
- पण आता हे चित्र बदललेले दिसून येत आहे.
- जुलैच्या शेवटच्या आठवड्याच्या तुलनेत ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या ३६% वाढली आहे.
- आर्थिक उलाढालींमध्ये वाढ होऊ लागल्याने आणि विमान प्रवासाचे भाडे कमी असल्याने प्रवाशांची संख्या वाढली आहे.
जुलै मधील शेवटच्या आठवड्यातील प्रवाशांची संख्या सरासरी ९० होती, जी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ३०% वाढून ११७ झाली.
३१ जुलै पर्यंत म्हणजेच जुलैच्या शेवटच्या आठवड्यात सरासरी दैनिक उड्डाणांची संख्या १७३० होती. जी ७ ऑगस्टला संपलेल्या आठवड्यात १९३७ वर पोहोचली आहे.
प्रती उड्डाण प्रवाशांच्या संख्येतही वाढ
- जानेवारी – १११
- फेब्रुवारी – १२१
- मार्च – १०८
- एप्रिल – ९१
- मे – ६७
- जून – ८८
- जुलै – ९७
- ऑगस्ट (पहिला आठवडा) – ११७
दैनंदिन उड्डाणांमध्येही १२% वाढ
- जानेवारी – २,०५४
- फेब्रुवारी – २,१८९
- मार्च – २,२९७
- एप्रिल – २,३०३
- मे – २,०१०
- जून – ९२३
- जुलै – १,१४०
- ऑगस्ट (पहिला आठवडा) – १,९३७
ऑगस्ट आणि जानेवारी मधील प्रवाशांची संख्या जवळजवळ सारखीच
- जानेवारी – २,३०,०००
- फेब्रुवारी – २,४६,०००
- मार्च – २,८०,०००
- एप्रिल – २,४९,०००
- मे – २,३०,०००
- जून – ६३,०००
- जुलै – १,५८,०००
- ऑगस्ट (पहिला आठवडा) – २,२७,०००