मुक्तपीठ टीम
एअर इंडियाच्या विमानांमध्ये आता अनेक नवीन सुविधा मिळणार आहेत. लोकांचा प्रतिसाद बघता प्रवाशांना अधिक आणि सर्वोत्तम सुविधा देण्याचा विचार केला आहे. टाटा समूहाची एअरलाइन एअर इंडियाचे जागतिक नेटवर्क आणि बाजारपेठेतील हिस्सा वाढवण्यासाठी एअरलाइन लांब पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सवर अधिक सुविधांसह इकॉनॉमी क्लास सादर करणार आहे.
एअर इंडिया विमानांमध्ये आता ‘टाटा टच’! इकॉनॉमी क्लास सुविधा…
- एअरलाइन दीर्घकालीन पुनरुज्जीवन योजनेवर काम करत आहे.
- पुढील पाच वर्षांमध्ये एअरलाइनचा ताफा तसेच जागतिक नेटवर्क वाढवण्याची योजना आखत आहे.
- रग्ज, पडदे, सीट कव्हर-कुशन बदलले जातील.
- देशांतर्गत उड्डाणांच्या मेनूमध्ये पूर्णपणे सुधारणा करण्यात आली आहे.
- पुढील महिन्यापासून लांब पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये अधिक आरामदायी इकॉनॉमी क्लास होणार आहे.
- २० विमानांची दुरुस्ती करण्यात आली आहे.
- ३० अतिरिक्त विमानांचे भाडेपट्टे निश्चित करण्यात आले आहे.
- या विमानांचा पुरवठा पुढील आठवड्यापासून सुरू होईल.
- बोईंग, एअरबस आणि इंजिन उत्पादक कंपन्यांशी नव्या पिढीच्या विमानांची ऑर्डर देण्यासाठी बोलणी सुरू आहे.
- एअर इंडियाने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कामचा विस्तार केला आहे.
- व्हँकुव्हर, सिडनी आणि मेलबर्नसाठी अधिक उड्डाणे सुरू केली आहेत.
- भारतातील सात शहरांमधून लंडनला थेट विमानसेवा आहे.
- येत्या काही आठवड्यांत सॅन फ्रान्सिस्को, न्यूयॉर्क आणि नेवार्कसाठी थेट विमानसेवा सुरू होणार आहे.
जेआरडी टाटा मेमोरियल ट्रस्टच्या एका कार्यक्रमात टाटाचे सीईओ आणि एमडी कॅम्पबेल विल्सन म्हणाले की, पुढील काही वर्षात भारत आणि एअर इंडियाला जगातील विमान वाहतूक क्षेत्रात मोठी भूमिका बजावण्याच्या संधी आहेत. एअर इंडिया देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गावरील बाजारपेठेतील हिस्सा किमान ३० टक्क्यांपर्यंत वाढवेल.