Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कृषी निर्यातीला नव्याने चालना, २०२२-२३ मध्ये २३.५६ अब्ज अमेरिकन डॉलरचे लक्ष्य साध्य करण्यासाठी प्रयत्न! प्रसिद्धीवरही भर!!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Agriculture Dept

मुक्तपीठ टीम

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या कृषी उत्पादन निर्यात प्रोत्साहन संस्था म्हणजेच अपेडाने वर्ष २०२२-२३ वित्तीय वर्षासाठी २३.५६ अब्ज अमेरिकन डॉलर निर्यातीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी भागधारकांपर्यंत पोहचण्याचे धोरण आखले आहे. चालू वर्षात निर्यातीला चालना देण्यासाठी ३०० कार्यक्रम आयोजित करण्याची योजना आखली आहे.

प्रस्तावित महत्वाकांक्षी धोरणांतर्गत, निर्यातदार, शेतकरी, कृषी व्यावसायिक, खाद्यपदार्थ प्रक्रियादार, पुरवठा साखळी वाहतूकदार, परकीय चलन व्यवस्थापन कंपन्या आदींपर्यंत विविध मुख्य प्रवाहातील प्रकाशने आणि इलेक्ट्रॉनिक वाहिन्या तसेच प्रमुख समाजमाध्यम मंच यांच्याशी ज्या कृषी उत्पादनांची विपुल निर्यात क्षमता आहे, त्यांच्यावर ठळक प्रकाश टाकण्यासाठी नियमित आणि मजबूत संपर्क स्थापित केला जाईल.

अधिकाधिक निर्यातदारांना आकर्षिक करून घेण्यासाठी, अपेडाची निर्यात प्रक्रियेसंबंधी माहितीपत्रके विशेषतः इलेक्ट्रॉनिक माध्यमांसह विविध मंचांवर प्रसारित केली जातील. तसेच तळागाळातील तसेच ग्रामीण स्तरावर निर्यातीच्या लाभांसह तिची प्रक्रियेबाबत एक पानी बातम्या वितरित केल्या जातील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याच्या केलेल्या आवाहनाच्या धर्तीवर, प्रत्यक्ष आणि तांत्रिक प्रशिक्षणासह होतकरू कृषी व्यावसायिकांचे संगोपन करून त्यांनी कृषी निर्यात हे क्षेत्र आकर्षक करिअर म्हणून निवडावे, यासाठी त्यांना प्रेरित केले जाईल.

निर्यातदारांच्या यशाच्या गाथांसंबंधी व्हिडिओ आणि इन्फो ग्राफिक्स बनवून समाज माध्यमांमध्ये त्याचे नियमित प्रोत्साहन देण्याचेही प्रस्तावित केले आहे. कृषी निर्यात प्रोत्साहन संस्थेने शेतकरी, स्टार्ट अप्स, निर्यातदार, आदींच्या प्रेरणादायक यशोगाथा विविध मुद्रित आणि समाज माध्यमांमध्ये छापून आणण्याचेही प्रस्तावित केले आहे.

 

पाहा:


Tags: American DollarAPEDAGood news MorningUnion Ministry of Commerce and Industryअमेरिकन डॉलरकृषी उत्पादन निर्यात प्रोत्साहन संस्थाकृषी निर्यातकेंद्रीय वाणिज्य आणि उद्योगगुड न्यूज मॉर्निंग
Previous Post

स्विगीचं मस्त धोरण, सध्याची नोकरी करतानाच दुसरीकडे कामाचं स्वातंत्र्य!

Next Post

ओला आज आणखी दोन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याची शक्यता!

Next Post
OLa CAr and Bike

ओला आज आणखी दोन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याची शक्यता!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!