मुक्तपीठ टीम
एका रशियन चित्रपटाची शुटिंग, ती ही अंतराळात! आश्चर्य वाटलं ना? हो हे घडलंय प्रत्यक्षात. रशियातील एका चित्रपटामधील ३५ ते ४० मिनिटांच्या दृश्यांचे चित्रीकरण १२ दिवस अंतराळातील स्पेस स्टेशनवर झाले. आता ही टीम नुकतीच पृथ्वीवर परतली आहे.
रशियन ‘चॅलेंज’ चित्रपटातील एका दृश्याचे चित्रीकरण करण्यासाठी ही टीम अंतराळात गेली होती. अंतराळातील आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर १२ दिवस घालवलेल्या क्रूमध्ये अभिनेत्री युलिया पेरेसिल्ड आणि दिग्दर्शक क्लीम शिपेन्को यांचा समावेश होता. आता ही टीम अनुभवी अंतराळवीर ओलेन नॉविस्कीसह परत आली आहे. ते ISS वर १९१ दिवस उपस्थित होते.
या क्रूच्या स्पेस शटलने रविवारी सकाळी ६.४५ वाजता (भारतीय वेळेनुसार) स्पेस स्टेशनवरून उड्डाण केले आणि सुमारे साडेतीन तासांनी सकाळी १० वाजून ५ मिनिटांनी कझाकिस्तानमध्ये यशस्वी लँडिंग केले. लँडिंगनंतर संपूर्ण क्रू सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली आहे.
अवकाशात ३५ मिनिटांचे दृश्यासाठी १२ दिवस शुटिंग
- चित्रपटाच्या टीमला ‘चॅलेंज’ च्या शूटिंगसाठी खास प्रशिक्षण देण्यात आले होते.
- ‘चॅलेंज’ चे वेगवेगळे सीन्स शूट करण्यासाठी, फिल्म टीमने १२ दिवस अंतराळात घालवताना आयएसएसवर ३५ ते ४०मिनिटांचा लांब सीन शूट केला.
- या चित्रपटात एका महिला डॉक्टरची कथा आहे जी अंतराळयात शस्त्रक्रियेची गरज असलेल्या अंतराळवीराला वाचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर उड्डाण जाते.
- आयएसएसवर असलेले अंतराळवीर अँटोन श्काप्लेरोव आणि प्योत्र डुबरोव्ह यांनीही चित्रपटाच्या या दृश्यात भूमिका केली आहे.
रशियाने हॉलिवूडला मागे टाकले
- ‘चॅलेंज’ चित्रपटाच्या शूटिंगसह, रशियाने हॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक टॉम क्रूज यांना मागे टाकले आहे.
- ज्यांनी नासा आणि एलोन मस्क यांची कंपनी स्पेस एक्स यांच्या सहकार्याने २०२० मध्ये अंतराळात चित्रपट शूट करण्याची घोषणा केली होती.
- मात्र, अंतराळात रशिया आणि अमेरिका यांच्यातील ही स्पर्धा नवीन नाही.
- अंतराळ मोहिमांची स्पर्धा सुरु होताच रशियाने स्पुटनिक आकाशात सोडून अमेरिकेला मागे टाकले होते, पण चंद्रावर पहिला माणूस पाठवून अमेरिकेने उट्टे काढले होते.