Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोल्हापुराच्या पर्यटन विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्नांची आदित्य ठाकरेंची घोषणा! तलवार आणि अंबाबाईची प्रतिमा देवून सत्कार!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Ambabai Pratima

मुक्तपीठ टीम

कोल्हापूर जिल्ह्यास नैसर्गिक देणगी लाभली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटनाच्या दृष्टीने अनेक समृद्ध ठिकाणे असून, सह्याद्री डोंगररांगा, नद्या, अभयारण्य, ऐतिहासिक तलाव, धरणे येथील नैसर्गिक संपन्नतेचे दर्शन घडवितात. या नैसर्गिक ठिकाणांसह श्री अंबाबाई मंदिर, महत्वाची धार्मिक स्थळे, ऐतिहासिक गडकिल्ले, पुरातन वास्तू या कोल्हापूरचे महत्त्व अधिकच अधोरेखित करतात. पर्यटन वृद्धीतून कोल्हापूर जिल्ह्याचा विकास व्हावा, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते, युवा सेना अध्यक्ष आणि राज्याचे पर्यटन मंत्री नाम.मा.श्री.आदित्य ठाकरे साहेब यांनी केले. जिल्ह्यातील पर्यटन वृद्धीसाठी नाम.श्री.आदित्य ठाकरे यांच्यामार्फत पर्यटन विभागाकडून मंजूर निधीबद्दल करवीरवासीयांच्या वतीने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी चांदीची तलवार, श्री अंबाबाईची मूर्ती, पुष्पहार व शाल देवून नागरी सत्कार करण्यात आला.

tourism development of Kolhapur

शिवसेना नेते, युवा सेना अध्यक्ष आणि राज्याचे पर्यटन मंत्री नाम.मा.श्री.आदित्य ठाकरे साहेब दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आज सकाळी मंत्री आदित्य ठाकरे साहेब यांनी श्री अंबाबाई मंदिर येथे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी शिवसेना शहर कार्यालय शनिवार पेठ येथे भेट देवून पदाधिकारी आणि शिवसैनिकांशी संवाध साधला. यावेळी शिवसैनिकांनी “जय भवानी, जय शिवाजी”, “नामदार आदित्य ठाकरे साहेब आगे बढो”, “शिवसेना जिंदाबाद” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी फटक्यांची आतषबाजी करीत पारंपारिक वाद्यांच्या गजरात मंत्री नाम.ठाकरे साहेबांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते, युवा सेना अध्यक्ष आणि राज्याचे पर्यटन मंत्री नाम.मा.श्री.आदित्य ठाकरे साहेब यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

tourism development of Kolhapur

यानंतर शिवसेना नेते, युवा सेना अध्यक्ष आणि राज्याचे पर्यटन मंत्री नाम.मा.श्री.आदित्य ठाकरे साहेब यांचा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी चांदीची तलवार, श्री अंबाबाईची मूर्ती, पुष्पहार व शाल देवून नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी निधी मंजूर झाल्याने आगामी काळात कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन विकासास चालना मिळणार आहे. मंजूर झालेल्या निधीबद्दल समस्त करवीरवासीयांच्या वतीने आपले आभारी असल्याची भावना व्यक्त केली.

 

यावेळी शिवसेना नेते, युवा सेना अध्यक्ष आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे साहेब यांनी, पुढील काळातही कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी निधीची तरतूद करण्याची ग्वाही दिली. यासह उपस्थित लोकप्रतिनिधीना आप-आपल्या भागातील कामे सुचविण्याच्या सूचना करीत यास तात्काळ निधी देण्याबाबत आश्वासित केले.

 

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबीटकर, जिल्हाप्रमुख विजय देवणे, मा.आम.चंद्रदीप नरके, मा.आम.सत्यजित पाटील, शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारुगले, भगिनी मंच अध्यक्षा सौ.वैशाली क्षीरसागर, सौ.दिशा ऋतुराज क्षीरसागर, युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, युवा नेते पुष्कराज क्षीरसागर, माजी स्थायी समिती सभापती नंदकुमार मोरे, माजी उपमहापौर रविकिरण इंगवले, माजी परिवहन सभापती राहुल चव्हाण, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, इंद्रजीत आडगुळे, अभिषेक देवणे आदी शिवसेना, युवा सेना व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.


Tags: Ambabai PratimaKolhapurmuktpeethtourism developmentTourism Minister Aditya Thackerayअंबाबाई प्रतिमाकोल्हापूरपर्यटन विकासपर्यटनमंत्री आदित्य ठाकरेमुक्तपीठ
Previous Post

आता शेतकऱ्यांचा ‘अकोले पॅटर्न’! बुधवारी मुंबईत घोषणा!

Next Post

आरोग्य खाते परीक्षेसाठी नवी पद्धत, आरोग्य मंत्री राजेश टोपेंचा नवा उपाय!

Next Post
rajesh Tope

आरोग्य खाते परीक्षेसाठी नवी पद्धत, आरोग्य मंत्री राजेश टोपेंचा नवा उपाय!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!