मुक्तपीठ टीम
आगामी मुंबई मनपा निवडणुकीची तयारी सर्व पक्षांकडून केली जात आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मुंबई मनपा निवडणुकीच्या कामाला लागा असा आदेश दिला आहे. यादरम्यान शिवसेनेकडून मनपा निवडणुकीत एका विशिष्ट वयोगटातील उमेदवारांना तिकीट देणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
आदित्य ठाकरेचं ट्वीट
- आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत या सर्व चर्चा फेटाळल्या आहेत.
- आदित्य ठाकरे म्हणाले, विशिष्ट वयोगटाला निवडणुकीचे तिकीट देण्याबाबत गेले २-३ दिवस मी काही बातम्या बघत आहे.
या बातम्या खोट्या आहेत. - शिवसेना पक्षात फक्त जनतेची अहोरात्र सेवा करणाऱ्यांनाच इतर कोणताही भेदभाव न करता तिकीट मिळतं, असं आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.
विशिष्ट वयोगटाला निवडणुकीचे तिकीट देण्याबाबत गेले २-३ दिवस मी काही बातम्या बघत आहे. या बातम्या खोट्या आहेत. शिवसेना पक्षात फक्त जनतेची अहोरात्र सेवा करणाऱ्यांनाच इतर कोणताही भेदभाव न करता तिकीट मिळतं.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 9, 2022
त्या चर्चा नेमक्या कोणत्या?
- मुंबई आणि ठाणे मनपा निवडणुकीत शिवसेना ५० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या काही नगरसेवक किंवा नेत्यांना तिकीट देणार नसून त्यांच्या जागी तरुणांना संधी देणार असल्याच्या चर्चा सध्या माध्यमावर सुरु होत्या.
- शिवसेनेत तरुणांना संधी देण्याबाबत विचार सुरु असल्याचा चर्चा सुरु होत्या.
- विविध माध्यमांनी यासंदर्भात बातम्या दिल्या होत्या.
- अखेर आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भातील ट्विट करुन त्या चर्चा फेटाळल्या आहेत.