Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“राज्यांना टॉसिलीझूमॅबचा अतिरिक्त पुरवठा वितरित”- डी.व्ही.सदानंद गौडा

May 12, 2021
in घडलं-बिघडलं
0
sadananda gowda

मुक्तपीठ टीम

 

देशभरातून येणारी वाढती मागणी लक्षात घेऊन, टॉसिलीझूमॅबच्या ४५,००० कुप्यांचा अतिरिक्त पुरवठा राज्यांना/केंद्रशासित प्रदेशांना वितरित करण्यात आला आहे. केंद्रीय रसायन आणि खत मंत्री डी.व्ही.सदानंद गौडा यांनी ही घोषणा केली.

टॉसिलीझूमॅबचे भारतात उत्पादन होत नसून, ‘हॉफमन ला रोशे’ या स्विस औषध कंपनीकडून त्याची आयात केली जाते. साधारण मार्च २०२१ पर्यंत देशातील विविध रुग्णालयांमधून येणारी टॉसिलीझूमॅबची मागणी व्यवस्थित भागविता येत होती. मात्र एप्रिल २०२१ पासून अचानकपणे कोरोना रुग्णसंख्या वाढत जाऊन या औषधाची मागणीही प्रचंड प्रमाणात वाढली.

३० एप्रिल २०२१ रोजी ४०० एमजी क्षमतेच्या ९,९०० इंजेक्शनचा उपलब्ध साठा विविध राज्ये/ केंद्रशासित प्रदेश आणि केंद्र सरकारच्या रुग्णालयांना वितरित करण्यात आला.

 

Additional 45000 vials of #Tocilizumab have been allocated to States/UTs to meet its demand across country.

Earlier, 9900 vials of the drug were made to all States on 30th April.

Besides these 2 allocations, another 50024 vials were alloted to states yesterday. pic.twitter.com/QkQwyVuwAm

— Sadananda Gowda (@DVSadanandGowda) May 11, 2021

रॉशे कंपनीने ८० एमजी क्षमतेच्या ५०,००० कुप्या भारतातील कोरोना रुग्णांसाठी इंडियन रेड क्रॉस सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून १० मे २०२१ रोजी सद्भावनापूर्वक दान केल्या आणि भारत सरकारने त्या राज्ये/ केंद्रशासित प्रदेश आणि केंद्र सरकारच्या रुग्णालयांना वितरित केल्या.

यानंतर ८० एमजी क्षमतेच्या ४५,००० कुप्या व्यापारी तत्त्वावर ११ मे २०२१ रोजी भारतात आयात करण्यात आल्या. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालय व औषधनिर्माण विभागाने ११ मे २०२१ रोजी त्या राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना वितरित केल्या. ४५,००० पैकी ४०००० कुप्या वापरण्याचा निर्णय राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांवर सोपविण्यात आला असून, त्या-त्या राज्य/केंद्रशासित प्रदेशातील सरकारी तसेच खासगी रुग्णालयांतील रुग्णांना त्याचा उपयोग होऊ शकणार आहे. हे औषध उपलब्ध करून देणाऱ्या यंत्रणेविषयी राज्य सरकारांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती व प्रसिद्धी करावी, असा सल्ला राज्यांना देण्यात येत आहे. जेणेकरून, गरजू रुग्ण आणि खासगी रुग्णालयांना त्याची माहिती मिळू शकेल व राज्यातील संबंधित अधिकाऱ्यांना त्यासाठी संपर्क साधने त्यांना शक्य होईल. तसेच, या औषधाची साठेबाजी आणि काळा बाजार रोखण्यासाठी सर्व उपाययोजना करण्याच्या सूचनाही राज्यांना देण्यात येत आहेत. हे औषध कोरोना रुग्णांसाठी अतिशय न्यायोचित पद्धतीने आणि राष्ट्रीय क्लिनिकल व्यवस्थापन प्रोटोकॉलनुसारच वापरले जाईल, याची खबरदारीही राज्यांनी घ्यायची आहे.

टॉसिलीझूमॅबचे अतिरिक्त वितरण केल्यामुळे कोरोना रुग्णांसाठी ते पुरेशा प्रमाणात उपलब्ध होऊन, या महामारीचा सामना करण्यासाठी सरकारकडून सुरु असलेल्या प्रयत्नांना भक्कम जोड मिळू शकणार आहे.


Tags: sadanand gowdatocilizumabकेंद्र सरकारटॉसिलीझूमॅबडी.व्ही.सदानंद गौडारॉशे कंपनी
Previous Post

देशभरातील ५९ कोटी युवावर्गासाठी मे महिन्यात राज्यांना फक्त २ कोटी डोस!

Next Post

मराठा आरक्षणप्रश्नी लवकरच मुख्यमंत्री पंतप्रधानांची भेट घेणार

Next Post
narendra modi

मराठा आरक्षणप्रश्नी लवकरच मुख्यमंत्री पंतप्रधानांची भेट घेणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!