Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

देशभरातील ५९ कोटी युवावर्गासाठी मे महिन्यात राज्यांना फक्त २ कोटी डोस!

September 6, 2026
in आरोग्य
0
Youth Vaccination

मुक्तपीठ टीम

केंद्र सरकारने १८ ते ४४ वयोगटातील युवा वर्गाच्या लसीकरणाची थाटात घोषणा केली पण प्रत्यक्षात त्यासाठी लसींची व्यवस्था करण्याची जबाबदारी ज्या राज्यांवर सोपवली आहे, त्यांच्यासाठी लसी पुरेशा लसी मात्र मिळत नसल्याची तक्रार आहे. मे महिन्यात देशभरातील राज्य सरकारं केंद्राच्या कोट्यानुसार फक्त दोन कोटी डोस खरेदी करू शकणार आहेत. लोकसंख्येनुसार राज्यांना दोन कोटी डोसमध्ये हिस्सा मिळणार आहे. त्यामुळे आता आणखी लसींच्या व्यवस्थेसाठी इतर राज्यांनाही महाराष्ट्रासारखाच ग्लोबल टेंडरचा मार्ग स्वीकारावा लागण्याची शक्यता आहे. कारण देशातील ५९ कोटी ५० लाख लोकसंख्येसाठी केंद्राच्या कोट्यानुसार विकत मिळणाऱ्या लसी खूपच कमी पडतील.

 

केंद्र सरकारकडून राज्यांसाठी लस वितरणाचे सूत्र सर्वोच्च न्यायालयासमोर सादर केले गेले आहे. यानुसार, राज्य सरकारांना मे महिन्यात १८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी सुमारे दोन कोटी डोस दिले जातील. भारतात या महिन्यात लसीच्या साडे आठ कोटी डोसचे उत्पादन होणे अपेक्षित आहे. केंद्राने असे म्हटले आहे की त्यांनी लस उत्पादकांकडून थेट राज्यांकडून खरेदी करणे आवश्यक असलेल्या डोससाठीही कोटा निश्चित केला आहे.

 

काय आहे केंद्राचा फॉर्म्युला?

  • लसींच्या डोसची समान प्रमाणात वाटणी होईल.
  • त्यासाठी हे दोन कोटी डोस १८-४४ वयोगटातील लोकसंख्येच्या आधारे ही वाटणी होईल.
  • केंद्र सरकारने लसी उत्पादकांशी सल्लामसलत करून प्रत्येक राज्यातील युवा वर्ग लोकसंख्येवर आधारित कोटा निश्चित केला आहे. राज्ये केवळ लसीची निश्चित प्रमाणात खरेदी करु शकतील.

 

लसींचे वाटप कसे होते?

  • केंद्र सरकारने भारतातील लस उत्पादकांसाठी काही अटी बंधनकारक आहेत.
  • भारतातील लस उत्पादकांना लसीचा ५० टक्के हिस्सा केंद्र सरकारला पुरवावा लागतो.
  • त्यानंतर उरलेल्या ५० टक्क्यांमधून लस उत्पादक कंपनी खाजगी खरेदीदार आणि राज्य सरकार यांना विकू शकते.
  • केंद्र सरकार त्यांना मिळालेल्या ५० टक्के लसींच्या डोसचा राज्यांना ४५ वर्षांपेक्षा अधिक वयोगटासाठी मोफत पुरवठा करते.
  • १८ ते ४४ वयोगटातील युवा वर्गासाठी मात्र राज्यांना लस विकत घ्यावी लागते. बहुतेक राज्य ती मोफत देत आहेत.
  • सध्या देशात युवा वर्गाची लोकसंख्या ५९ कोटी ५० लाख आहे.

 


Tags: coronavaccinationyouth vaccination'कोरोनायुवा लसीकरणलसीकरण
Previous Post

गोव्याच्या लेखा संचालनालयात अकाउंटंटच्या १०९ जागांसाठी भरती

Next Post

“राज्यांना टॉसिलीझूमॅबचा अतिरिक्त पुरवठा वितरित”- डी.व्ही.सदानंद गौडा

Next Post
sadananda gowda

"राज्यांना टॉसिलीझूमॅबचा अतिरिक्त पुरवठा वितरित"- डी.व्ही.सदानंद गौडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!