Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सरकारी खुलाशानंतर पुनावालांचा खुलासा: बातम्या खोट्या, २६ कोटी लसींची मागणी!

१५ कोटी पुरवले, राज्य व खाजगी रुग्णालयांना ११ कोटी डोस पुरवणार!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
adar poonawalla 2

मुक्तपीठ टीम

कोरोना लसींसाठी केंद्र सरकारकडून नव्याने मागणीत आली नसल्याच्या बातमीचा केंद्र सरकारने इंकार केला. कोविशिल्ड उत्पादक सीरमला दिलेल्या १७०० कोटींच्या आगाऊ रकमेचा व्यवहारही उघड केला. त्यानंतर सीरम इंस्टिट्युटचे सीईओ अदार पुनावाला यांनी तातडीने खुलासा करुन मागणी केली नसल्याच्या बातम्यांचा इंकार केला आहे.

सरकारी खुलाशानंतर पुनावालांचा खुलासा आला आहे, हे विशेष! पुनावाला म्हणालेत की, लसींसाठी आगाऊ मागणीच नसल्याच्या बातम्या खोट्या आहेत. २६ कोटी लसींच्या डोसची मागणी केंद्र सरकारने केली होती. सीरमने त्यातील १५ कोटी डोस पुरवले आहेत. त्याच बरोबर सीरम राज्य सरकार व खाजगी रुग्णालयांना ११ कोटी डोस अतिरक्त पुरवणार आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात लसीकरण मोहिमेला गती आली आहे. त्याचवेळी देशात लसींचा मात्र तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे देशात स्पुटनिकसारख्या परदेशी लसींचीही आयात करण्यात येत आहे. असं असलं तरीही सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अदर पूनावाला यांनी देशाच्या लोकसंख्येच्या दृष्टीनं लसींची कमतरता भासत असल्याचे म्हटले आहे.

काय म्हणाले अदर पुनावाला-

  • ट्विटरवर निवेदनाद्वारे पुनावाला म्हणाले की, अनेक खोट्या बातम्यांदरम्यान लोकांना योग्य माहिती देणे आवश्यक होते.
  • अदार पुनावाला यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या अनेक विधानांचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे.
  • लसींच्या तुटवड्याबद्दल बोलताना पूनावाला म्हणाले, “पहिली गोष्ट म्हणजे लस तयार करणे ही एक विशेष प्रक्रिया आहे. लसींचा पुरवठा एका रात्रीत वाढवता येत नाही.
  • पुनावाला म्हणाले की, भारताची लोकसंख्या जास्त आहे, हे आपल्याला समजून घ्यायला हवे.
  • अशा परिस्थितीत सर्वांसाठी कोरोना लस तयार करणे हे सर्व सोपे काम नाही.
  • आपल्यापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या देशांमध्येही लसींचा तुटवडा जाणवत आहे.
  • या व्यतिरिक्त पुनावाला यांनी सरकारबरोबरचे सामंजस्य कमकुवत करण्याच्या आरोपालाही प्रत्युत्तर दिले आहे.
  • ते म्हणाले की आम्ही गेल्या वर्षी एप्रिलपासून सरकारशी सामंजस्य राखत काम करत आहोत.
  • आम्हाला सरकारकडून सर्व प्रकारचा पाठिंबा मिळाला आहे, मग तो वैज्ञानिक असो, नियमांच्याबाबतीत असो की आर्थिक सहकार्य असो.
  • सरकारकडून लसीसाठी नवी मागणी न मिळाल्याच्या प्रश्नालाही त्यांनी उत्तर दिले आहे.
  • पूनावाला म्हणाले, “आतापर्यंत आम्हाला २६ कोटी लसींच्या डोसचे ऑर्डर मिळाली आहेत.
  • यापैकी आतापर्यंत आमच्यावतीने १५ कोटी डोस पुरविण्यात आला आहे.
  • या व्यतिरिक्त पुढील ११ कोटी डोससाठी सरकारने १,७३२ कोटी रुपयांची आगाऊ रक्कम दिली आहे.
  • येत्या काही महिन्यांत ११ कोटी डोस आमच्याद्वारे पुरविण्यात येईल.
  • त्याशिवाय पुढील काही महिन्यांत राज्य व खाजगी रुग्णालयांना आमच्या वतीने ११ कोटी अतिरिक्त डोसचा पुरवठा केला जाईल.
  • पुनावाला म्हणाले की ही लस लवकर दिली जावी अशी आपल्या सर्वांची इच्छा आहे.
  • आम्ही यासाठी बरेच प्रयत्न करीत आहोत.
  • आशा आहे की आपण लवकरच कोरोनाविरुद्धची लढाई जिंकू.

 

Amongst multiple reports it is important that correct information be shared with the public. pic.twitter.com/nzyOZwVBxH

— Adar Poonawalla (@adarpoonawalla) May 3, 2021


Tags: Adar Poonawallacorona vaccineserum-instituteअदर पूनावालाकोरोनाकोरोना लससीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया
Previous Post

सीरम विरुद्ध केंद्र सरकार…लसींसाठी १७०० कोटी आगाऊ दिल्याचा केंद्राचा दावा

Next Post

ममतांच्या विजयात एमआयएमच्या अपयशाचाही वाटा

Next Post
owaisi

ममतांच्या विजयात एमआयएमच्या अपयशाचाही वाटा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!