Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सामाजिक परिवर्तनासाठी एका हाती संघर्ष आणि एका हाती रचना…. अभिनेत्री चिन्मयी सुमीत

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Rashtra Seva Dal

मुक्तपीठ टीम

सामाजिक परिवर्तनासाठी एका हाती संघर्ष आणि एका हाती रचना या दोन्ही गोष्टींची आज नितांत गरज आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांनी आज महाड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात राष्ट्र सेवा दल,मुंबईने आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले.

Rashtra Seva Dal

२१ जुलैच्या महापुरात महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्सचे खूप नुकसान झाले होते. कॉलेजातील रसायनशास्त्र विभागातील प्रयोगशाळेस राष्ट्र सेवा दल मुंबईच्या वतीने साहित्य प्रदान करण्याचा कार्यक्रम चिन्मयी सुमीत यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या प्रसंगी विचारमंचावर मुंबईतील व्ही.जे. टी.आय.चे निवृत्त असोशियट डीन आणि सानेगुरूजी राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष डॉ.संजय मंगला गोपाळ, कॉलेजचे प्राचार्य डॉ.धनाजी गुरव, राष्ट्र सेवा दल मुंबईचे कार्याध्यक्ष शरद कदम, सानेगुरूजी राष्ट्रीय स्मारकाच्या विश्वस्त सिरत सातपुते, प्रा.दीपक क्षीरसागर उपस्थित होते.

आज मी या महाविद्यालयात आले आणि माझे मन मराठवाड्यातील औरंगाबाद मधील पी. ई.सोसायटीच्या डॉ.आंबेडकर महाविद्यालयाच्या आठवणीत गेले. माझी आई डॉ.आंबेडकर कॉलेज मध्ये मानसशास्त्र विभागप्रमुख होती. याच मातीत माझ्यावर चांगले संस्कार झाले. माझं बालपण समृध्द झाले. आपल्या भावना आणि विचार सतत एकत्रितपणे जपण्याचे वातावरण मला तिथे मिळाले त्याबद्द्ल कृतज्ञता आणि अभिमान वाटतो. माझी आई नामांतराच्या आंदोलनात तुरुंगात गेलेली आहे. या कार्यक्रमाला येण्यापूर्वी मी चवदार तळ्याशी जावून नतमस्तक झाले. मी जे समतेचे विचार मानते ते विचार आचरणात यायला हवेत अशी माझी धारणा आहे. आजकालच्या वातावरणात खूप अस्वस्थता दाटून येते मात्र राष्ट्र सेवा दला सारख्या संघटना, संस्था समाजासाठी असं काही काम करताना पाहिले की हेच वातावरण खूपच आश्वासक वाटायला लागते असेही चिन्मयी सुमीत यांनी सांगितले.

Rashtra Seva Dal

आपत्ती मध्ये मदत करणे हे जसे गरजेचे आहे तसेच ती आपत्ती येवू नये यासाठी ही प्रयत्न करायला पाहिजे. सेवा दल तशा पद्धतीने काम करते असे प्रतिपादन व्हि.जे. टी.आय.चे निवृत्त असोशियट डीन आणि सानेगुरूजी राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी केले.

 

रेड क्रॉस सारखी संस्था रक्त सांडल्यावर मलमपट्टी लावण्याचे काम करते. राष्ट्र सेवा दल त्याच्या एक पाऊल पुढे जावून काम करते. हे असे का होतेय या बद्दल प्रश्न विचारते आणि पुन्हा असे होवू नये म्हणून धोरण आखून प्रयत्न करते अशा शब्दांत राष्ट्र सेवा दलाच्या कार्याचा गौरव डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी केला.

 

Rashtra Seva Dal

अवकाळी पाऊस, पूर, उष्णतेचे वाढते प्रमाण आदी पर्यावरणीय प्रश्नाचा धांडोळा घेण्याचे काम तुम्हा विद्यार्थ्यांचे आहे. कुणी तरी परिस्थिती बदलेल असा विचार न करता काय करणे आवश्यक आहे या प्रेरणा निर्माण होवून कचरा, प्लास्टिक यांचा विचार होवून पर्यावरण रक्षणाचा प्रयत्न करून असे प्रसंग पुन्हा येणार नाहीत अशी जीवनशैली जोपासण्याचे आवाहन संजय मंगला गोपाळ यांनी यावेळी उपस्थितांना केले.

 

कॉलेजचे प्राचार्य डॉ.धनाजी गुरव यांनी राष्ट्र सेवा दलाने केलेल्या मदती बद्दल आभार व्यक्त केले. प्रा.दीपक क्षीरसागर यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचलन केले. कार्यक्रमाचं प्रास्ताविक राष्ट्र सेवा दल मुंबईचे कार्याध्यक्ष शरद कदम यांनी केले. त्यांनी राष्ट्र सेवा दलाने आपत्तीग्रस्त कोकणात केलेल्या मदतीचा आढावा घेतला. ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय होऊ नये म्हणून राष्ट्र सेवा दल,मुंबई मदत घेऊन आलं आहे. या कामात स्थानिकांनीही योगदान द्यावं असं आवाहनही शरद कदम यांनी केलं. आपत्तीच्या काळात मदतीला सरसावलेलं राष्ट्र सेवा दल व साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक महाडकरांच्या सुखदुःखात कायम सोबत राहिल असं सोबतीचं आश्वासन राष्ट्र सेवा दलाच्या पूर्णवेळ कार्यकर्त्या व साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या विश्वस्त सिरत सातपुते यांनी याप्रसंगी महाडकरांना दिले.

 

Rashtra Seva Dal

या कार्यक्रमा नंतर महाड नगर परिषदेच्या शाळा क्रमांक १ आणि शाळा क्रमांक २ मध्ये संगणक, वाचनालयासाठी कपाटे आणि इतर शैक्षणिक साहित्य अभिनेत्री चिन्मयी सुमीत आणि डॉ.संजय मंगला गोपाळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी गाणी, गोष्टी आणि गप्पांमधून मुलांशी संवाद साधण्यात आला. करोनाकाळात बंद असलेली आणि पूराच्या पाण्याचे सावट असलेली शाळा यानिमित्ताने मुलांच्या किलबिलाटाने आणि गाण्यांच्या आवाजाने गजबजून गेली.


Tags: Actress Chinmayi SumeetDr. Babasaheb Ambedkar MahavidyalayaMahadmumbairashtra seva dalअभिनेत्री चिन्मयी सुमीतडॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयमहाडमुंबईराष्ट्र सेवा दल
Previous Post

ऐन उत्तरप्रदेश निवडणुकीपूर्वी संसदेत मथुरा कृष्ण जन्मभूमीचा मुद्दा! ‘जैसे थे’ स्थिती कायदा रद्द करण्याची मागणी!!

Next Post

सरन्यायाधीश रमण्णांची चिंता: विद्यार्थ्यांमधून बंद झाला मोठ्या नेतृत्वाचा उदय!

Next Post
Ramana

सरन्यायाधीश रमण्णांची चिंता: विद्यार्थ्यांमधून बंद झाला मोठ्या नेतृत्वाचा उदय!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!