Tuesday, September 29, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बाळासाहेब लांडगेंच्या बैठकीत सहभागी झाल्यास कुस्तीपटू, प्रशिक्षक, पंच यांच्यावर कारवाई होणार

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
maharashtra kustigir parishad

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेशी बाळासाहेब लांडगे यांचा कोणताही संबंध नसून, त्यांनी आयोजित केलेल्या बैठकीत किंवा स्पर्धेत सहभागी होऊ नये, अशा सूचना भारतीय कुस्ती महासंघाने दिल्या आहेत. तसे आढळून संबंधित पैलवान, प्रशिक्षक, रेफ्री, जिल्हा व राज्य कुस्तीगीर संघ आणि संबंधित व्यक्तींवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे आदेश महासंघाने परिपत्रकाद्वारे दिले आहेत. भारतीय कुस्ती महासंघाचे प्रधान सचिव व्ही. एन. प्रसुद यांनी हे परिपत्रक काढले आहे.

kabaddi federation of india

भारतीय कुस्ती महासंघाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त केली असून, संजय कुमार सिंह यांच्या अध्यक्षतेखाली अस्थायी समिती नेमलेली आहे. शिवाय परिषदेची नव्याने निवडणूक घेण्यात आली आहे. माननीय न्यायालयाच्या निर्णयानंतर या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. असे असताना बाळासाहेब लांडगे स्वतःला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे महासचिव असल्याचा दावा करत आहेत. महाराष्ट्रात कुस्ती स्पर्धा भरविण्याचा, तसेच महासंघाच्या निर्णयाविरोधात कार्यकारिणीची बैठक बोलावण्याचा प्रयत्न करत आहेत. ही गोष्ट बेकायदेशीर असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे.

पुणे जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे म्हणाले, “भारतीय कुस्ती महासंघाच्या अस्थायी समितीने महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरविण्याची जबाबदारी पुणे राष्ट्रीय तालीम संघावर सोपवली आहे. त्यामुळे बाळासाहेब लांडगे यांनी स्वतंत्र प्रसिद्धीपत्रक काढून महाराष्ट्रातील कुस्तीगीर व कुस्तीशौकीनांची दिशाभूल करु नये. महाराष्ट्रातील कुस्तीगीर हा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी, त्यात प्राविण्य मिळविण्यासाठी रात्रंदिवस घाम गाळत असतो. त्यामुळे त्याच्या आयुष्याशी व करिअरशी बाळासाहेब लांडगे यांनी खेळू नये.”

पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष हिंदकेसरी योगेश दोडके म्हणाले, “महासंघाच्या आदेशास न जुमानता कोणीही बेकायदेशीर स्पर्धा घेऊ नयेत. अशा स्पर्धात कुस्तीगीर किंवा पंचानी सहभागी होऊ नये. कारण संबंधित कुस्तीगीर व पंच यांना राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्यास बंदी घातली जाणार असल्याचे आदेश महासंघाने दिलेले आहेत. लांडगे यांनी कुस्ती स्पर्धा घेण्याचा अपप्रचार करू नये. जेणेकरून कुस्तीगीर बळी पडतील. कुस्तीगीर व पंचानी अशा बेकायदेशीर स्पर्धा व बैठकांपासून दूर राहावे.”


Tags: Balasahebh LandgeMaharashtraMaharashtra Rajya Kustigir Parishadबाळासाहेब लांडगेमहाराष्ट्रमहाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद
Previous Post

गुजरात पूल मृत्यूकांड: फिटनेस प्रमाणपत्र नसतानाही सुरु केला जुना पूल, टोल तिकीटं विकताना ठेवलं नाही क्षमतेचं भान!

Next Post

मुख्यमंत्री शिंदेंच्या अजेंड्यावर लवकरच अयोध्या दौरा का?

Next Post
CM Eknath Shinde Ayodhya Tour

मुख्यमंत्री शिंदेंच्या अजेंड्यावर लवकरच अयोध्या दौरा का?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!