मुक्तपीठ टीम
भारतीय रेल्वे आता काळानुसार कायाकल्प घडवत आहे. रेल्वे गाड्यांमधील सुविधा वाढवत रेल्वे स्थानकांचं आधुनिकीकरण सुरु ही जगातील सर्वात मोठी रेल्वे सेवा आहे आणि या संदर्भात प्रवाशांना सर्व सुविधा उपलब्ध करून देणे ही रेल्वेची मोठी जबाबदारी आहे. मात्र, प्रवाशांना कोणतीही अडचण होऊ नये, यासाठी रेल्वेकडूनही विशेष लक्ष दिले जात आहे. आता रेल्वे प्रवाशांना एक मोठी सुविधा देणार आहे, ज्याचे नाव आहे पॉड हॉटेल.
भारतीय रेल्वेने मुंबई सेंट्रल स्थानकावर प्रथमच पॉड हॉटेल सुरू केले आहे. ट्रेनमध्ये प्रवास केल्यानंतर जर एखाद्या प्रवाशाला थकवा जाणवत असेल तर तो या हॉटेलमध्ये राहून त्याचा थकवा दूर करू शकतो. विशेष म्हणजे पॉड हॉटेलमध्ये प्रवाशांसाठी सर्व सुविधा उपलब्ध असतील आणि विशेष म्हणजे याचे भाडेही खूपच कमी आहे, म्हणजेच ते अगदी बजेटमध्ये आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे हे पॉड हॉटेल आणि त्याचे भाडे किती आहे?
पॉड हॉटेल आहे कुठे?
- मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनच्या पहिल्या मजल्यावर पॉड हॉटेल बांधण्यात आले आहे.
- सध्या ४८ पॉड रूम्स तयार करण्यात आल्या आहेत.
- या रुम्समध्ये खासगी पॉड्सपासून ते क्लासिक पॉड्सपर्यंत आहेत.
- विशेष म्हणजे येथे दिव्यांगांसाठी खास सोय तयार करण्यात आली आहेत.
.
कोणत्या सुविधा?
पॉड हॉटेलच्या सुविधांबद्दल बोलायचे झाल्यास, येथे प्रवाशांना सामानाची खोली, शॉवर रूम, स्वच्छ वॉशरूम आणि कॉमन एरिया या सुविधा उपलब्ध असतील. याशिवाय पॉडमध्ये मोबाईल किंवा लॅपटॉपसाठी चार्जिंग पॉईंट, मोफत वायफाय, टीव्ही आणि वाचनासाठी रीडिंग लाइटही असेल.
पॉड हॉटेलचे भाडे किती?
- पॉड हॉटेलमध्ये प्रवासी १२ ते २४ तास राहू शकतात.
- येथे राहण्यासाठी ९९९ ते १९९९ रुपये भाडे द्यावे लागेल.
- तुम्हाला खाजगी पॉडमध्ये राहायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला १२४९ ते २४९९ रुपये भाडे द्यावे लागेल.
पाहा व्हिडीओ: