मुक्तपीठ टीम
जस्टिन बीबरचे चाहते जगभरात आहेत. मागील काही दिवसांपासून जस्टिनच्या आजाराचे गुढ आतापर्यंत कोणालाच माहित नव्हते. आता त्याने एका व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या आजाराबद्दलची माहिती उघड केली आहे. जस्टिनने सांगितले की, त्याच्या उजव्या बाजूच्या चेहऱ्याला अर्धांगवायू झाला आहे. रॅमसे हंट सिंड्रोम असे या आजाराचे नाव आहे. हे विषाणूमुळे होते. व्हेरिसेला झोस्टर असे या विषाणूचे नाव आहे. कानाजवळील चेहऱ्याच्या मज्जातंतूवर त्याचा परिणाम होतो.
डोळ्याची एका बाजूची पापणी लवत नाही
- जस्टिन बीबरने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून सांगितले की तो रॅमसे हंट सिंड्रोमने ग्रस्त आहे.
- त्याच्या चेहऱ्याची उजवी बाजू अर्धांगवायू झाली आहे. यामुळे त्याने अनेक शो रद्द केले आहेत.
- जस्टिनने व्हिडीओमध्ये सांगितले आहे की, त्याच्या एका डोळ्याची पापणीही लवत नाही आहे.
- जस्टिन म्हणतो की त्याचा देवावर विश्वास आहे आणि तो बरा होईल अशी आशा आहे. यादरम्यान, तो विश्रांती घेईल आणि चेहऱ्याचा व्यायाम करत आहे.
रॅमसे हंट सिंड्रोमची लक्षणं
- तीव्र कान दुखणे
- एका बाजूला श्रवणशक्ती कमी होणे
- चेहऱ्याची एक बाजू कमकुवत होणे एक डोळा बंद करता न येणे आणि डोळे मिचकावणे देखील कठीण होऊ शकते.
रॅमसे हंट सिंड्रोम म्हणजे काय?
- रामसे हंट सिंड्रोम हा विषाणूजन्य संसर्ग आहे.
- हे व्हेरिसेला झोस्टर विषाणूमुळे होते.
- चिकनपॉक्स देखील या विषाणूमुळे होतो.
- हा विषाणू आतील कानाच्या चेहऱ्याच्या मज्जातंतूंवर परिणाम करतो.
- यामुळे चेहऱ्याचा पक्षाघात होऊ शकतो.
- याशिवाय कानात वर्टिगो, अलर्स येणे किंवा जखम होणे देखील असू शकते.