Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दोन हजारांच्या नोटा गेल्या तरी कुठे? रिझर्व्ह बँकेनं केलं उघड…

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
2000 note

मुक्तपीठ टीम

भारतात मोदी सरकारद्वारे करण्यात आलेली नोटाबंदी आणि त्यावेळी उडालेली सर्वांची तारांबळ आजही प्रत्येकाला ज्ञात आहे. नोटाबंदीला सहा वर्षे झाली यानंतर, बरेच काही बदलले आहे. नोटाबंदीनंतर पाचशेच्या नोटमध्ये बदल करण्यात आले तर, हजारची नोट बंद करत २ हजारची नोट जारी करण्यात आली. सध्या बाजारात २ हजारांच्या नोटा कमी पाहायला मिळत आहेत. प्रत्यक्षात गेल्या तीन वर्षांपासून २ हजार रुपयांची एकही नोट जारी झालेली नाही. अशा परिस्थितीत ही नोट चलनात नगण्य आहे.

२ हजारांच्या नोटांचे काय झाले?

  • नवीन नोटा जारी करण्यामागचा उद्देश हा होता की नवीन नोटा लवकरात लवकर देशभरात पसरल्या पाहिजेत.
  • परंतु सध्या बाजारात २ हजारांच्या नोटा फारच कमी दिसत आहेत.
  • भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडून समोर आलेल्या माहितीनुसार, ३१ मार्च २०२२ पर्यंत देशभरात चलनात असलेल्या २ हजारांच्या नोटांचा वाटा केवळ १३.८ टक्के इतका कमी झाला आहे.
  • तर, आरटीआयनुसार, २०१९-२०, २०२०-२१ किंवा २०२१-२२ मध्ये २ हजारांच्या नोटा छापल्या गेल्या नाहीत.
  • २०१६-१७ या आर्थिक वर्षात, RBI Note Mudran (P) Ltd ने २ हजार रुपये दर्शनी मूल्याच्या ३ लाख ५ हजार ४२९.९१ कोटी नोटा छापल्या.
  • यानंतर, २०१८-१९ मध्ये केवळ ४६६.९० कोटी नोटा छापल्या गेल्या, जे २०१७-१८ मध्ये छापण्यात आलेल्या १११५.०७ कोटी नोटांपेक्षा खूपच कमी आहे.

‘या’ नोटा लवकरच चलनात येणार?

भारतीय रिझर्व्ह बॅंकेने आर्थिक वर्ष २०२० पासून २ हजारांच्या नोटा छापल्या नाहीत, तज्ज्ञांचे मत आहे की २ हजारांच्या नोटा छापण्याचे कोणतेही कारण नाही, विशेषत: काळा पैसा वसूल करण्याच्या घटना चालू असताना. याशिवाय, २ हजारांच्या बनावट नोटांचे चलन वाढले असून, मध्यवर्ती बँकेने आर्थिक वर्ष २०२२ मध्ये २ हजारांच्या बनावट नोटांमध्ये ५५ टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे. २ हजारांच्या नोटा गायब झाल्या नसून त्यांची संख्या कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Tags: २ हजार नोट2000 notedemonetisationIndiamuktpeethReserve Bank of IndiaRTIआरटीआयघडलं-बिघडलंनोटाबंदीभारतमुक्तपीठरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
Previous Post

गुजरात निवडणूक २०२२: मुस्लिम मतांचं किती महत्व? यावेळी कुणाला मिळणार कौल?

Next Post

आज वर्ल्ड काइंडनेस डे! या दिवसाचे महत्त्व काय? जाणून घ्या

Next Post
World Kindness Day

आज वर्ल्ड काइंडनेस डे! या दिवसाचे महत्त्व काय? जाणून घ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!