मुक्तपीठ टीम
भारतात मोदी सरकारद्वारे करण्यात आलेली नोटाबंदी आणि त्यावेळी उडालेली सर्वांची तारांबळ आजही प्रत्येकाला ज्ञात आहे. नोटाबंदीला सहा वर्षे झाली यानंतर, बरेच काही बदलले आहे. नोटाबंदीनंतर पाचशेच्या नोटमध्ये बदल करण्यात आले तर, हजारची नोट बंद करत २ हजारची नोट जारी करण्यात आली. सध्या बाजारात २ हजारांच्या नोटा कमी पाहायला मिळत आहेत. प्रत्यक्षात गेल्या तीन वर्षांपासून २ हजार रुपयांची एकही नोट जारी झालेली नाही. अशा परिस्थितीत ही नोट चलनात नगण्य आहे.
२ हजारांच्या नोटांचे काय झाले?
- नवीन नोटा जारी करण्यामागचा उद्देश हा होता की नवीन नोटा लवकरात लवकर देशभरात पसरल्या पाहिजेत.
- परंतु सध्या बाजारात २ हजारांच्या नोटा फारच कमी दिसत आहेत.
- भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडून समोर आलेल्या माहितीनुसार, ३१ मार्च २०२२ पर्यंत देशभरात चलनात असलेल्या २ हजारांच्या नोटांचा वाटा केवळ १३.८ टक्के इतका कमी झाला आहे.
- तर, आरटीआयनुसार, २०१९-२०, २०२०-२१ किंवा २०२१-२२ मध्ये २ हजारांच्या नोटा छापल्या गेल्या नाहीत.
- २०१६-१७ या आर्थिक वर्षात, RBI Note Mudran (P) Ltd ने २ हजार रुपये दर्शनी मूल्याच्या ३ लाख ५ हजार ४२९.९१ कोटी नोटा छापल्या.
- यानंतर, २०१८-१९ मध्ये केवळ ४६६.९० कोटी नोटा छापल्या गेल्या, जे २०१७-१८ मध्ये छापण्यात आलेल्या १११५.०७ कोटी नोटांपेक्षा खूपच कमी आहे.
‘या’ नोटा लवकरच चलनात येणार?
भारतीय रिझर्व्ह बॅंकेने आर्थिक वर्ष २०२० पासून २ हजारांच्या नोटा छापल्या नाहीत, तज्ज्ञांचे मत आहे की २ हजारांच्या नोटा छापण्याचे कोणतेही कारण नाही, विशेषत: काळा पैसा वसूल करण्याच्या घटना चालू असताना. याशिवाय, २ हजारांच्या बनावट नोटांचे चलन वाढले असून, मध्यवर्ती बँकेने आर्थिक वर्ष २०२२ मध्ये २ हजारांच्या बनावट नोटांमध्ये ५५ टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे. २ हजारांच्या नोटा गायब झाल्या नसून त्यांची संख्या कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.