मुक्तपीठ टीम
आपल्या अद्भूत धैर्याने पाकिस्तानचे लढाऊ विमान उद्ध्वस्त करणारे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना त्यांच्या शौर्याबद्दल आज सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अभिनंदन यांना वीर चक्र देऊन सन्मानित केले. २७ फेब्रुवारी २०१९ रोजी त्यांनी पाकिस्तानचे एफ-१६ हे लढाऊ विमान त्यांनी पाडून उद्ध्वस्त केले होते.
पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावानंतर अभिनंदन वर्धमान यांनी हवाई संघर्षात एफ-१६ हे लढाऊ विमान पाडले. त्यांचे धाडस पाहता यावर्षी ३ नोव्हेंबरला त्यांना प्रमोशनही देण्यात आले. त्यांच्याकडे ग्रुप कॅप्टनची जबाबदारी देण्यात आली होती. २७ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या हवाई संघर्षात अभिनंदन वर्धमान यांनी मिग-२१ विमानात असताना एफ-१६ हे लढाऊ विमान पाडले होते.
अभिनंदन यांची अभिमानास्पद कामगिरी बनले देशाचे रिअल हिरो
- मिग-२१ सारख्या जुन्या विमानातून स्वार होऊनही अभिनंदन यांनी पाकिस्तानचे आधुनिक लढाऊ विमान एफ-१६ ला पाडले होते.
- त्यानंतर त्यांच्या या कामगिरीमुळे ते देशाचे नायक म्हणून समोर आले.
- या युद्धादरम्यान ते पाकिस्तानात पडले होते. त्यानंतर त्यांना तेथे अटक करण्यात आली.
- यानंतर भारताने राजनैतिक दबाव टाकून दुसऱ्याच दिवशी त्यांना पाकिस्तानातून आणले.
- संपूर्ण देश त्याच्या सुटकेसाठी प्रार्थना करत होता. वाघा बॉर्डरवर त्यांची सुटका करण्यात आली.
ही घटना घडली तेव्हा अभिनंदन वर्धमान श्रीनगरच्या ५१ स्क्वॉड्रनचा भाग होते. २६ फेब्रुवारी रोजी भारताने पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा येथील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळावर हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानी हवाई दलाने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर भारताने चोख प्रत्युत्तर दिले.
वीर चक्र का देण्याचे मूळ कारण
- युद्धाच्या वेळी अप्रतिम शौर्य दाखवणाऱ्या सैनिकांना वीर सन्मान चक्र दिले जाते.
- हा देशाचा तिसरा सर्वोच्च सन्मान आहे.
- हे चक्र मरणा नंतरही दिले जाते. शौर्यामध्ये, ते महावीर चक्र नंतर दिले जाते.
- जिवाची पर्वा न करता शत्रूंविरुद्ध लढणाऱ्या शूर सैनिक आणि सैनिकांना हे पदक दिले जाते.
- हे पदक चांदीचे आहे. निळ्या आणि केशरी रंगाच्या फितीसोबत ते दिले जाते.