सचिन परब
रिंगणचं कॅलेंडर येणार म्हणून मागे पोस्ट टाकली होती. तेव्हापासून जातो तिकडे सगळे विचारतात, कॅलेंडर कधी येणार? पण कॅलेंडर काही केल्या हातात येत नव्हतं.
काम खूप किचकट होतं. संतपरंपरेशी संबंधित दिनविशेषांच्या हजारापेक्षा जास्त नोंदी मिळाल्यात. त्यांच्या तिथी किंवा तारखा शोधून काढणं. ते बिनचूक चौकोनात बसवणं. अभंगांचं देखणं आणि अचूक सुलेखन करणं. संतकथेला न्याय देणारं चित्र आणि चित्राला न्याय देणारं कवर करणं. अशा गोष्टींसाठी आमच्या सगळ्यांची धावपळ सुरू होती.
आपल्याला संतांची जास्तीत जास्त सेवा करायचीय, इतकीच भावना होती. त्यामुळे ३१ डिसेंबर झाला, तरी यंदा कॅलेंडर काढायचंच ठरवलं होतं. आता सरत्या वर्षाचे ७ दिवस उरले असताना तुम्हाला कळवतोय. आतबट्ट्याचा असला तरी हा मुळात व्यवहार नसल्याने विक्री कशी होईल, याची चिंता नाहीच.
रिंगण अभंगदर्शन या कॅलेंडरची वैशिष्ट्यं अशी
- ज्ञानेश्वर माऊली आणि संत नामदेवराय यांच्या संवादातून उलगडणारं वारकरी तत्वज्ञान सांगणाऱ्या तीर्थावळीच्या अभंगांची ओळख
- तीर्थावळीच्या अभंगांपैकी एक अभंग प्रत्येक महिन्याच्या पानावर देखण्या सुलेखनासह
- संतपरंपरेशी जोडलेले हजारो दिनविशेष
- माऊली आणि नामदेवरायांचं सुंदर चित्र
- घराच्या भिंतीवर शोभून दिसेल अशी उत्तम सजावट, रंगीत छपाई आणि उत्तम निर्मितीमूल्यं.
तीर्थावळीचे अभंगच कॅलेंडरवर का?
संतशिरोमणी नामदेवरायांच्या अभंगगाथेमुळे आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींचं चरित्र माहीत आहे. त्यातलं तीर्थावळी हे प्रकरण भारी आहे.
तmत माऊली आग्रह करून नामदेवांना तीर्थयात्रेला घेऊन जातात. चालता चालता माऊली नामदेवरायांना भक्तीविषयक प्रश्न विचारतात. विशेष म्हणजे माऊलींनी आधीच ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. प्रश्नांच्या उत्तरादाखल नामदेवराय वारकरी दृष्टीने भजन, नामस्मरण, ध्यान अशा भक्तीच्या नऊ पायऱ्यांच्या अफलातून व्याख्या करतात. त्यातून वारकरी तत्वज्ञान सुसंगत उलगडत जातं.
तीर्थावळीच्या अभंगातच पुढे हे तत्वज्ञान समजवणारी विहिरीतल्या पाण्याची कथा आहे. त्याचं चित्र आपल्या रिंगण अभंगदर्शन दिनदर्शिका वर विराजमान आहे. शिवाय या प्रकरणाच्या शेवटी मावंद्याचं वर्णन आहे. त्यात खुद्द पांडुरंगाने केलेल्या पंढरपूरच्या ब्राह्मणांच्या गर्वहरणाचा भाग येतो. या सगळ्या तीर्थावळीच्या ५९ अभंगातले १२ निवडक अभंग आपल्या कॅलेंडरवर सजले आहेत.
वारकरी संतविचार समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असूनही तीर्थावळीचे अभंग आपल्या सगळ्यांकडून दुर्लक्षित राहतात. ते कीर्तन, प्रवचन, भजन, लिखाण यातून वारंवार समोर यायला हवेत. त्यासाठी या तीर्थावळीच्या अभंगांचं कॅलेंडरच बनवून रिंगणने तुम्हाला सादर केलं आहे.
रिंगणचं कॅलेंडर पुन्हा छापायला दिलंय
आज वर्षाचा शेवटचा दिवस ७-८ दिवसांपूर्वी *रिंगण अभंगदर्शन दिनदर्शिका* हातात आली. इतक्या कमी दिवसात सगळ्या १००० कॉपी विकल्या जाणार नाहीतच. ३००-४०० उरतील. याची खात्री होती. पण प्रत्यक्षात पाच दिवसांतच हजारापेक्षा जास्त कॅलेंडरची ऑर्डर आली. पैसे आलेत, पण पाठवायला हातात कॅलेंडर नाही, अशी परिस्थिती झाली. म्हणून परवडत नसूनही दुसरी १०००ची खेप छापायची ऑर्डर दिलीय.
तुम्ही सगळ्यांनी भरभरून दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून आभार. ज्यांनी फोनवर कळवलं आहे, त्या प्रत्येकाला कॅलेंडर मिळेल. पण थोडा उशीर होईल. त्यासाठी माफ कराल. उद्या परवा कॅलेंडरची नवी खेप माझ्या हातात पोचेल अशी अपेक्षा आहे. लगेचच तुमच्यासाठी पाठवता येईल.
सध्या या दुकानांत रिंगण अभंगदर्शन उपलब्ध असण्याची शक्यता आहे.
- दादर मुंबई – आयडियल बुक डेपो, आयडियल पुस्तक त्रिवेणी, मॅजेस्टिक शिवाजी मंदिर, मुंबई – पीपल्स बुक डेपो, फोर्ट
- पुणे पुस्तकविश्व, डहाणूकर कॉलनी, कोथरूड, माणगावकर एजन्सी, प्रभात थिएटरसमोर, अप्पा बळवंत चौक, अक्षरधारा, बाजीराव रस्ता, उत्कर्ष बुक डेपो, डेक्कन
- नाशिक- सचिन अहिरराव, अमूल, शॉप नं. ९, मेन्लो पार्क, चेरी हिल्सशेजारी, आनंदवली सिग्नलजवळ, पाईपलाईन रोड, मो. ९४२२२४५३३३, नंदन रहाणे मो. ९८८१९०८०१०
कॅलेंडर तुम्हाला घरपोच हवंय तर संपर्क साधा*, प्रदीप पाटील (विदर्भ) : ९८६०८३१७७६, सुधीर शिंदे (मुंबई) : ९८६७७५२२८०, शेखर सोनार (पुणे) : ९६७३८४४६३६, त्र्यंबकेश्वर मिरजकर (इस्लामपूर) : ९८८१०३५८०३, अभिजित सोनावणे (पुणे) : ८८८८८९५२२६
किंमत फक्त ५० रुपये आहे. घरपोच पाठवण्याचा खर्च वेगळा द्यावा लागेल. किंवा तुम्ही मलाही संपर्क करू शकता.
सचिन परब, रिंगणचा संपादक ९९८७०३६८०५ | ९४२०६८५१८३