मुक्तपीठ टीम
भारतीय चित्रपटसृष्टीसाठी ही एक अभिमानास्पद बातमी आहे. ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म अर्काइव्ज’ म्हणजेच ‘एफआयएएफ’च्यावतीने अभिनेते अमिताभ बच्चन यांना सन्मानित करण्यात येणार आहे. अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल एफआयएएफ पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले भारतीय आहेत. अभिनेते मार्टिन स्कोर्सेस आणि क्रिस्टोफर नोलन १९ मार्च रोजी ऑनलाईन कार्यक्रमात बिग बींचा सन्मान करतील.
स्कोर्सेस आणि नोलन यांनाही एफआयएएफ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. एफआयएएफचे अध्यक्ष फ्रेडरिक मेर यांनी म्हटले आहे की, एफआयएएफचा २० वा वार्षिक पुरस्कार सोहळा यावर्षी आयोजित केला जाईल. हा महत्त्वाचा प्रसंग अविस्मरणीय बनविण्यासाठी जगातील सर्वात मोठ्या अभिनेत्यांपेक्षा कोणीही असू शकत नाही. ज्यांनी बर्याच वर्षांपासून चित्रपटसृष्टीला आपले मानून त्यात स्वत:ला जोखून दिले. ते म्हणाले की, अमिताभ बच्चन यांना प्रतिष्ठित एफआयएएफ पुरस्काराने सन्मानित करून, आम्हाला जगाला हे दाखवून द्यायचे आहे की, चित्रपटाचा वारसा किती श्रीमंत आणि वैविध्यपूर्ण आहे.
एफआयएएफशी संबंधित फिल्म हेरिटेज फाउंडेशनने बच्चन यांना नामांकन दिले होते.
पाहा व्हिडीओ: