मुक्तपीठ टीम
आज स्त्रिया पुरुषांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांच्याही पुढे चालल्या आहेत. त्या सर्व क्षेत्रात आपला सहभाग दाखवत आहेत. खेळांमध्येही पुरुषांच्या समान स्तरावर महिलांचा सहभाग वाढत आहे. रिषीता जैन या १७ वर्षीय भारतीय कन्येनेही ते करून दाखवले आहे. जे मोठ-मोठे खेळाडूही करू शकत नाहीत. रिषीता दिल्लीत इयत्ता १२ वी मध्ये शिकत आहे. ती एक प्रोफेशनल पॉवरलिफ्टर आहे. तिने ४ सुवर्ण पदके जिंकली आहेत. कॅनडामध्ये कॉमनवेल्थ पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप झाली. तेथे तिने ही सुवर्णपदके जिंकली. या खेळामध्ये भाग घेणारी ती भारताची सर्वात तरुण खेळाडू होती.
जेव्हा ती आपल्या वडिलांसोबत जिममध्ये जायची, तेव्हा तिला पॉवरलिफ्टिंगमध्ये आवड निर्माण झाली. यावेळी, ती १५ वर्षाची होती. यानंतर, तिने यासाठी प्रोफेशनल तयारी सुरू केली. ती म्हणाली, “जेव्हा मी फुटबॉल संघात होते. तेव्हा मी जिममध्ये जायचे आणि एक्स्ट्रा ट्रेनिंग घ्यायचे. प्रथम माझ्या प्रशिक्षकाने माझ्या स्ट्रेन्थवर काम केले. कारण माझे शरीर इतके वजन उचलण्यास फिट नव्हते”. त्याने पुढे सांगितले की, “ती बर्याच तासांपर्यंत कसरत करत असे. तिच्या प्रशिक्षकानेही तिच्या आहारात बदल केले. पण तिला जंक फूड आवडायचे. यामुळे ती बर्याच वेळा ट्रेनिंग सोडायची”.
२०१७ मध्ये तिने पॉवर लिफ्टिंगला सुरूवात केली. ‘मला डेडलिफ्ट करण्यास सांगितले गेले. यात वजन उचलून धरून ठेवण्यास सांगितले. मी ६० किलो वजन उचलले आणि ते १० सेकंदांपर्यंत धरून ठेवले. असे रिषीताने सांगितले.
पाहा व्हिडीओ: