मुक्तपीठ टीम
अँड्रॉइड स्मार्टफोनची मेमरी खूप लवकर फूल होते, ज्यामुळे स्मार्टफोनवरील लोड वाढतो आणि काही काळानंतर स्मार्टफोन हँग होऊ लागतो. दरम्यान, व्हॉट्सअॅप या लोकप्रिय मेसेजिंग अॅपवर आपण बर्याच ग्रुपचे सदस्य असतो आणि बरेच लोक चॅटिंगसोबत फोटो किंवा व्हिडीओ पाठवत असतात. यामुळे स्मार्टफोनची इंटरनल स्टोरेज फूल होते. असे असल्याने स्मार्टफोनची गती टिकवून ठेवण्यासाठी आणि इंटरनल स्टोरेज विनाकारण फूल असल्यास त्यावर नियंत्रण आणण्यासाठी व्हॉट्सअॅपमधील काही फिचर्सवर नजर टाकणार आहोत…
मीडियाचे ऑटो डाऊनलोड कसे बंद कराल
- व्हॉट्सअॅपमध्ये डाउनलोड केलेले फोटो आणि व्हिडीओ फोनच्या गॅलरीमध्ये सेव्ह होतात.
- ज्यामुळे इंटरनेट डेटाचा वापरही मोठ्या प्रमाणात होतो आणि स्टोरेजही फूल होते.
- हे रोखण्यासाठी सर्वप्रथम सेटिंग्जमध्ये जा.
- त्यानंतर स्टोरेज पर्यायावर क्लिक करावे.
- मीडिया ऑटो-डाउनलोड वर गेल्यावर तीन पर्याय समोर असतील त्यामधील आपल्या आवडीनुसार पर्याय निवडा.
व्हॉट्सअॅपवरील निळ्या रंगाचे टिक्स बंद करण्यासाठी हे करा
- व्हॉट्सअॅपवर निळ्या रंगाच्या टिकच्या सहाय्याने आपल्याला समोरच्या व्यक्तीने मेसेज वाचला की नाही हे कळते.
- हे फिचर खूप चांगले आहे, परंतु जेव्हा आपणास कोणालाही प्रत्युत्तर द्यायचे नसते किंवा मेसेजही वाचण्याची इच्छा नसते, त्यावेळी निळ्या रंगाचे टिक बंद करू शकता.
- यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅपमध्ये वरच्या उजवीकडील बाजूस दिलेल्या तीन डॉट पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर, सेटिंग्ज वर जा आणि अकाउंटवर क्लिक करा.
- यानंतर, प्रायव्हसीवर वर क्लिक करा, आणि रिड रिसिप्टवर क्लिक करा.
- असे केल्यास हा पर्याय दिसण्यास बंद होईल.
व्हॉट्सअॅपवर प्रोफाइल फोटो कसे लपवाल
- व्हॉट्सअॅपमध्ये काही लोकांना प्रोफाइल फोटो सर्वांनाच न दाखवता काही मर्यादित लोकांना दाखवायचे असल्यास यासाठी व्हॉट्सअॅपमध्ये फिचर देण्यात आले आहेत.
- अशा परिस्थितीत, केवळ तेच लोक आपला फोटो पाहू शकतील, ज्यांना आपल्या कॉन्टॅक यादीमध्ये समाविष्ट केले आहे.
- यासाठी सर्वप्रथम सेटिंग्जमध्ये जा.
- यानंतर, अकाउंटवर जा आणि प्रायव्हसी वर क्लिक करावे.
- येथे आपल्याला प्रोफाइल फोटोचा पर्याय दिसेल.
त्यात सर्वांसाठी, फक्त कॉन्टॅक्टमधील आणि कोणालाही नाही असे पर्याय दिसतील. - यातील आपली गोपनीयता लक्षात घेऊन पर्याय निवडा.