मुक्तपीठ टीम
कंझावला प्रकरणाने एक नवे वळण घेतलं आहे. अंजलीला १२ किमी फरफटत नेणाऱ्या कार मालक व या प्रकरणातील सहावा आरोपी आशुतोष याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. आशुतोष हा अपघात झालेल्या बलेनो कारचा मालक आहे. अंजलीचा अपघात त्याच्यामुळेच घडला आणि तो पोलिसांपासून हे सत्य लपवत असल्याचं सांगण्यात येत आहे. तो म्हणाला की अमितच त्याच्याकडे गाडी मागायला आला होता. दुसरीकडे अंजलीसोबत पार्टीत असण्याचा दावा करणारी तिची मैत्रीण निधीचीही पोलीस कसून चौकशी करत आहोत. देशाच्या राजधानीतील निर्भया प्रकरणाची आठवण करून देणाऱ्या या कंझावला प्रकरणाचे गूढ ६ दिवसांनंतरही उलगडलेले नाही.
पाच आरोपींना यापूर्वीच अटक…
- कंझावला प्रकरणी दिल्ली पोलिसांनी यापूर्वी मनोज मित्तल, दीपक खन्ना, अमित खन्ना, कृष्णा आणि मिथुन या पाच आरोपींना अटक केली होती.
- यासोबतच अपघाताला कारणीभूत असलेली बलेनो कारही पोलिसांनी जप्त केली आहे.
- पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत एफआयआर नोंदवला आहे.
- यात गुन्हेगारी कट रचणे, हत्येचे प्रमाण नसलेले दोषी मनुष्यवध आणि निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरणे यासह गुन्हा दाखल केला आहे.
- यापूर्वी अंजली अपघात प्रकरणात दिल्ली पोलिसांनी सांगितले होते की, या प्रकरणात ५ नव्हे तर ७ आरोपी आहेत.
- पोलिसांनी आशुतोष आणि अंकुश खन्ना या दोन नवीन आरोपींची नावे जोडली होती.
- आता पोलिसांनी गाडीचा मालक आशुतोष याला अटक केली आहे.
पोलीस तपासात ‘ही’ माहिती उघड…
- गुरुवारी माहिती देताना पोलिसांनी सांगितले होते की, गाडी दीपक नव्हे तर अमित चालवत होता.
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमितकडे ड्रायव्हिंग लायसन्स नाव्हते.
- अंकुश खन्ना यांनी दीपकला गाडी चालवत असल्याचे पोलिसांना सांगण्याचा सल्ला दिला होता.
- त्याचवेळी विशेष पोलिस आयुक्त सागर प्रीत हुड्डा यांनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल डिटेल रेकॉर्डवरून आशुतोष आणि अंकुश खन्ना यांचा सहभाग निश्चित आहे.
- आशुतोष आणि अंकुश खन्ना असे दोन जण आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
- अंजलीला खेचून नेणारी कार चालवणारा आरोपी अपघाताच्या वेळी गाडीतही नव्हता, असा खुलासा पोलिसांनी केला आहे.
- दीपकचे त्यावेळचे फोन लोकेशन या प्रकरणातील अन्य चार आरोपींशी जुळत नसल्याचे पोलिसांना आढळून आले.
- त्याचे फोन लोकेशन आणि कॉल रेकॉर्डवरून तो दिवसभर घरीच असल्याचे पोलिसांनी सांगितले.