मुक्तपीठ टीम
नव्या वर्षाचं स्वागत करताना स्विगीच्या ग्राहकांची पसंती बिर्याणी आणि पिझ्झाला मिळाली आहे. फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीने शनिवारी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला देशभरात ३.५९ लाख बिर्याणी आणि २.५ लाख पिझ्झा ऑर्डर दिल्या. कंपनीच्या सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. जाणून घ्या बिर्याणी आणि पिझ्झाच्या किती ऑर्डर्स होत्या…
सर्वाधिक मागणी बिर्याणीसाठी…
- हैदराबादी बिर्याणीसाठी ७५.४ टक्के ऑर्डर आल्या.
- १४.२ टक्के ऑर्डर लखनवी बिर्याणीसाठी.
- १०.४ टक्के कोलकाता बिर्याणीसाठी आल्या.
- नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला सर्वाधिक ३.५० लाख ऑर्डर्ससह बिर्याणीची डिलिव्हरी करण्यात आली.
- हैदराबादच्या आघाडीच्या रेस्टॉरंट बावर्चीने नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला प्रति मिनिट सरासरी दोन बिर्याणी पुरवल्या.
- ही प्रचंड मागणी पूर्ण करण्यासाठी या रेस्टॉरंटने १५ टन बिर्याणी बनवली होती.
- स्विगीने शनिवारी रात्री १०:३० वाजता केलेल्या ट्विटमध्ये डॉमिनोज इंडियाला ६१,२८७ पिझ्झाच्या ऑर्डर डिल्व्हिरी आल्या.
- ओरेगॅनोची २.५ लाखांहून अधिक पाकिटे पिझ्झा ग्राहकांना वितरित करण्यात आल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले.