मुक्तपीठ टीम
“स्त्री आहे मी, नाही पडणार कमी!” ही जिद्द सध्या आपल्या स्त्रीशक्तीकडून प्रत्यक्षात कृतीतूनच मांडली जाते. आता बांग्लादेश सीमेचंचं पाहा. त्या भागातील शेकडो किलोमीटरवर पसरलेल्या सुंदरबन परिसराच्या सुरक्षेसाठी दक्षिण बंगाल फ्रंटियर ऑफ बॉर्डर सिक्युरिटी फोर्सने महिला सक्षमीकरणाच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. फ्रंटियरने तेथे महिला रक्षक तैनात केल्या आहेत. दक्षिण बंगाल फ्रंटियर ऑफ बॉर्डर सिक्युरिटी फोर्सने उचललेलं हे मोठं पाऊल आहे. महिलांवरील वाढता विश्वास त्यातून द्सत आहे.
बांग्लादेश सीमेवर भारतीय स्त्री शक्तीचा जागता पहारा!!
- दक्षिण बंगाल फ्रंटियरचे प्रवक्ते आणि डीआयजी अमरीश कुमार आर्य यांनी सांगितले की, बीएसएफच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.
- याला महिला सबलीकरणाच्या दिशेने एक ऐतिहासिक उपक्रम असेही म्हणता येईल.
- सुंदरबनसारख्या अवघड भागात सीमेवर गस्त घालण्यासाठी आणि फ्लोटिंग बीओपीच्या ऑपरेशनसाठी महिला जवानांना तैनात करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
- येथे महिला सैनिकांचे एक सैन्य तैनात करण्यात आली आहे.
- यात १५ ते २० सैनिक आहेत.
- प्रदेशातील नद्या भारत-बांगलादेश सीमेला विभागतात.
- त्यामुळे काही महिन्यांपूर्वी या भागावर पाळत ठेवण्यासाठी बीएसएफने सहा नवीन फ्लोटिंग बीओपी तैनात केल्या होत्या.
- यापैकी एक महिला बीएसएफ जवान ‘बीओपी गंगा’वर स्वार होऊन सुरक्षेची जबाबदारी पार पाडत आहे.
- आता बीओपीमधील सीमेवरील सुरक्षेची जबाबदारी बीएसएफच्या महिला शूरवीरांनी घेतली आहे.
- आता त्या स्वतंत्रपणे लढाऊ भूमिकेत दिसणार आहेत.