मुक्तपीठ टीम
हिवाळ्यात अॅलर्जिक ऱ्हायनायटिसचे प्रमाण वाढते. अॅलर्जी आणि नासिकाशोथ म्हणजे नाकातील संसर्ग. कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला याचा त्रास होऊ शकतो. यामुळे नाक बंद होणे व खाज येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, शिंका येणे, कानात अडथळे येणे, डोळ्यांना खाज येणे, घसा खवखवणे इत्यादी लक्षणे दिसतात. ज्या गोष्टींची अॅलर्जी आहे त्या गोष्टी टाळा. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर औषधे घ्या.
पोश्चरल फॉल इन ब्लडप्रेशर म्हणजे काय?…
- अॅलर्जिक ऱ्हायनायटिस ही समस्या कोणत्याही ऋतूत उद्भवू शकते.
- हिवाळ्यात या संसर्गाचे प्रमाण थोडे वाढते.
- या समस्येत नाक बंद झाल्यामुळे रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो.
- रुग्णाला नाक, कपाळ आणि डोळ्याभोवती वेदना जाणवतात.
- पीडित व्यक्तीची चव आणि वास घेण्याची क्षमता कमी होते.
- रुग्णाच्या स्थितीनुसार, डॉक्टर अॅलर्जीविरोधी औषधे देतात.
- रुग्णाला वाफ घेतल्याने फायदा होतो.
- हिवाळ्यात, मध्यमवयीन आणि वृद्ध व्यक्तींना बेडवरून उठल्यानंतर अचानक चक्कर येणे किंवा अस्वस्थता जाणवू शकते.
- हे पीडितेच्या कमी रक्तदाबामुळे होते.
- या समस्येला वैद्यकीय भाषेत ‘पोश्चरल फॉल इन ब्लडप्रेशर’ किंवा ‘हायपोटेन्शन’ असे म्हणतात.
असे झाल्यास काय करायचं?
- पीडित व्यक्तीचा रक्तदाब तपासून त्याला लिंबू आणि मीठ पाणी द्या.
- रुग्णाला आराम मिळत नसेल तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- पटकन बेडवरून उठणे टाळा.
- अंथरुणावरून उठण्यापूर्वी अंग झटका, हाता पायांची हाल चाल करा, मग हळू हळू उठा.