मुक्तपीठ टीम
इंस्टाग्राम रील्स आता इंस्टाग्राम लाइट वर ही उपलब्ध झाले आहेत. इंस्टाग्राम लाइट हे मुख्य अॅपचे लाइट वर्जन असून या अॅपचे मालकी हक्क फेसबुक कडे आहे. लाइट वर्जन वरील हे फिचर्स फक्त भारतीय यूजर्ससाठी उपलब्ध आहेत.
भारतामध्ये डिसेंबर २०२० मध्ये या लाइट वर्जनच्या टेस्टिंगला सुरूवात झाली होती. याची साइज २ एमबी पेक्षा कमी असून वापरायला अगदीच सोपे आहे. परंतु, मुख्य अॅपच्या तुलनेत यात मिळणारे फिचर्स कमी आहेत.
इंस्टाग्राम लाइट वर्जनवर आधी आयजीटीव्ही आणि रील्स हे फिचर्स उपलब्ध नव्हते. मात्र, आता यूजर्स मुख्य अॅप प्रमाणे ‘रील्स डेडिकेटेड टॅब’ मध्ये रील्स पाहू शकतात.
भारतामध्ये टिकटॉक वर बंदी आल्यानंतर लगेचच इंस्टाग्राम ने रील्स हे फिचर्स लाँच केले होते. कंपनीने कोणतेही वेगळे अॅप न आणता इंस्टाग्राम वरच रील्सचा पर्याय आणून त्यासाठी वेगळे टॅब उपलब्ध करून दिले आहे. ज्यात आपण जगभरातील यूजर्सचे व्हिडीओ पाहू व शेअर करू शकतो.
टिकटॉक व इंस्टाग्राम रील्स हे एकाच फॉरमॅटचे आहेत. मात्र, टिकटॉक वर व्हिडीओ अपलोड केल्यावर जसा वॉटरमार्क येतो, तसा रील्समध्ये येत नाही.