Monday, September 28, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

 चिनी हॅकर्सचा हल्ला झाला नसल्याचा केंद्र सरकारचा दावा ‘या’ राज्याने खोटा ठरवला!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
chaina hackers

मुक्तपीठ टीम

मुंबईतील वीज खंडित होण्यामागे चीनी हॅकर असल्याच्या महाराष्ट्र सायबर क्राइमच्या दाव्याला भले केंद्रीय ऊर्जामंत्री आर.के. सिंग यांनी फेटाळले असेल. पण त्यांच्या दाव्याच्या विरोधात आता तेलंगण विद्युत विभागाचे अधिकारीही सरसावलेत. त्यांच्या दाव्यानुसार मुंबईत केला तसाच प्रयत्न चीनी हॅकर्सनी तेलंगणातही केला होता.

तेलंगणामधील सरकारी अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार, गेल्या वर्षी १२ ऑक्टोबरला मुंबईत चिनी हॅकर्सनी वीजपुरवठा खंडित केला होता. त्यापाठोपाठ महाराष्ट्राच्या शेजारच्या तेलंगणा राज्यातही ब्लॅकआऊट करण्याचा प्रयत्न केला होता. महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सायबर क्राइमच्या तपासाच्या मुंबईत झालेल्या सायबर हल्ल्याबाबत माहिती दिली होती. राऊत म्हणाले की, फायरवॉल तोडून स्काडा युनिटमध्ये ८ ट्रोजन हॉर्स मालवेअरची प्रवेश घडवला गेला होता.

तेलंगणात दोन सायबर हल्ल्यांचे प्रयत्न
तेलंगणाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिनी हॅकर्सनी तेलंगणातील टीएस ट्रांस्को आणि टीएस गेनको या दोन पॉवर सिस्टिम हॅक करण्याचा प्रयत्न केल्या. या दोन्ही तेलंगणातील प्रमुख वीज वितरण यंत्रणा आहेत. सीईआरटी-इनकडून सूचना मिळाल्यानंतर या केंद्रांनी त्वरित कारवाई केली आणि आयपी सर्व्हरला ब्लॉक केले. रिमोट ऑपरेशनसाठी नियंत्रण कार्य देखील बंद केले.

वीजपुरवठ्यावर अधिक हल्ले
रेकॉर्डेड फ्युचर’ या संस्थेनं केलेल्या अभ्यासातून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. एनटीपीसी लिमिटेड, पाच विभागीय वितरण सेंटर आणि दोन बंदरांवर या हॅकर्सनी यापूर्वी हल्ला केला होता, अशी माहिती या संस्थेनं दिली आहे. यापूर्वी याच कंपनीनेnu गेल्या वर्षी मुंबईत झालेल्या ब्लॅकआउटमागे चिनी हॅकर्सचा सहभाग असल्याचे उघड केले होते. आतापर्यंत चिनी हॅकर्सनी भारताच्या वीजपुरवठ्यात अधिक लक्ष्य केले आहे. देशातील अंतर्गत यंत्रणेला त्रास देणे हा यामागील त्यांचा एकमेव उद्देश आहे.

गलवान हिंसाचारानंतर घटना वाढल्या
रेकॉर्ड फ्यूचरचा असा दावा आहे की, गलवानमधील हिंसाचारानंतर चिनी हॅकर्स सतत भारताच्या अंतर्गत यंत्रणेला हॅक करण्याचा कट रचत आहेत. ते काहींमध्ये यशस्वीही झाले आहेत. यासाठी भारतीय कंपन्यांना सतर्क राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. तथापि, सरकारच्या‘कंप्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ऑफ इंडिया’(सीईआरटी-इन) आणि नॅशनल क्रिटिकल इन्फॉर्मेशन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोटेक्शन सेंटर(एनसीआयआयपीसी) यासारख्या संस्था याकडे बारीक लक्ष ठेवून आहेत.

कोरोना लस बनविणार्‍या कंपनीवरही हल्ला
दोन दिवसांपूर्वी एका अहवालात असे म्हटले आहे की, चिनी हॅकर्सनी भारतातील कोरोना लस तयार करणार्‍या सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या दोन कंपन्यांवरही सायबर हल्ले केले आहेत. मात्र, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने असे कोणतेही आरोप फेटाळून लावणारे निवेदन जारी केले.


Tags: blackoutNitin Rautpowerकेंद्रीय ऊर्जामंत्री आर.के. सिंगचीनी हॅकरटीएस गेनकोटीएस ट्रांस्कोरेकॉर्डेड फ्युचर
Previous Post

इतिहास घडवणाऱ्या ‘त्या’ रॉकेटचा लँडिंगनंतर का झाला स्फोट?

Next Post

‘या’ अॅपच्या लाइट वर्जनवरही मिळणार टिकटॉकसारखंच फिचर

Next Post
instra

'या' अॅपच्या लाइट वर्जनवरही मिळणार टिकटॉकसारखंच फिचर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!