मुक्तपीठ टीम
शी जिनपिंग हे जगातील हुकूमशहा नेत्यांपैकी एक आहेत. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक माओ त्से तुंग यांच्यानंतर चीनचे ते पहिले शासक आहेत. शी जिनपिंग यांची तिसर्यांदा चीनचे अध्यक्ष आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचे सरचिटणीस म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांची पुढील पाच वर्षांसाठी चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली असली तरी आता ते या पदावर कायमस्वरूपी राहतील, असे मानले जात आहे. शी जिनपिंग यांची चीनच्या अध्यक्षपदी आणि सीपीसीच्या सरचिटणीसपदी निवड झाल्याने भारत-चीन द्विपक्षीय संबंध आणखीच वाढण्याची भीती आता खरी ठरताना दिसत आहे. अरुणाचलमधील सीमेवर कुरापती करून तणाव वाढण्याच्या अशा घटना अधिकच वाढण्याची शक्यता आहे. तवांगमधील संघर्षातून तसेच संकेत मिळत असल्याचं मानलं जातं.
सीमेवरील चीनी कुरापती!
- १५ जून २०२० पासून भारत-चीन सीमा वादात तणावात वाढ
- १५ जून २०२० रोजी चिनी सैनिकांनी पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय लष्कराच्या जवानांसोबत चकमकीची घटना घडवून आणली होती.
- चिनी सैन्याने घुसखोरी केल्याने भारताच्या उत्तर आणि ईशान्य सीमावर्ती भागात तणाव कायम होता.
- मात्र, चिनी सैन्याची घुसखोरी आणि सीमेवर तणाव कायम आहे.
तिबेटमध्ये लष्करी क्षमतेत वाढ!
- १९६२ मध्ये भारत आणि चीन यांच्यातील युद्धाला जवळपास ६० वर्षे उलटून गेली आहेत.
- भारतासोबतचे संबंध सुधारण्याऐवजी चीन सातत्याने तणाव वाढवत आहे.
- भारतीय सीमेला लागून असलेल्या भागात सैनिकांसाठी गावे वसवण्याबरोबरच चीनने रसद आणि शस्त्रास्त्र पुरवठ्यासाठी रेल्वे मार्ग आणि रस्तेही बांधले आहेत.
- त्यांनी तिबेटमध्ये आपली लष्करी व्यवस्था मोठ्या प्रमाणात मजबूत केली आहे.
- ते अरुणाचल प्रदेशसह ईशान्येकडील राज्यांमध्ये गुप्तपणे आपले सैन्य तैनात करत आहे.
- चीनने तिबेटमध्ये आपल्या सैन्याच्या तीन डझन तुकड्या आठ तुकड्यांमध्ये तैनात केल्याचंही समोर आलं आहे.
- लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्रांसाठी मोठ्या प्रमाणात तळ तयार करण्यात आले आहेत.
- त्या सर्व तळांवर लष्कराच्या सर्व गरजांसाठी लॉजिस्टिक क्षमता स्थापित करण्यात आली आहे.
आफ्रिकेतून भारतावर हल्ला करण्याची तयारी सज्ज!
- चीन लडाख आणि अरुणाचल प्रदेशमध्ये आपल्या सैन्याची घुसखोरी करत आहे.
- हिंदी महासागरातही चीन युद्धनौका तैनात करत आहे.
- भारताला घेरण्यासाठी चीनने आफ्रिकेत तळ बनवलं आहे.
- हिंद महासागरात आपला तळ बनवल्याची बातमी आहे.
- यात पाकिस्तान चीनला साथ देत आहे.
- चीनने पहिला विदेशी नौदल तळ जिबूती अशा प्रकारे तयार केला आहे की तो कधीही अति-विध्वंसक युद्धनौका तैनात करू शकतो.
- चीनच्या घातक पाणबुड्याही हिंदी महासागरात फेऱ्या मारत आहेत.