मुक्तपीठ टीम
फिफा विश्वचषक २०२२ मध्ये, १६व्या फेरीचे सामने होत आहेत. राऊंड ऑफ १६च्या सामन्यात जपानला बाहेर पडावे लागले कारण, पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाने जपानचा ३-१ असा पराभव केला. पण जपानच्या चाहत्यांनी आणि प्रशिक्षकाने संपूर्ण जगाला प्रभावित केले. जपानमधील प्रत्येक सामन्यानंतर त्यांचे चाहते संपूर्ण स्टेडियम स्वच्छ करूनच निघायचे. असेच एक दृश्य सामन्यातच पाहायला मिळाले ते म्हणजे एका जपानी चाहत्याने सामना संपल्यानंतर सर्व कचरा उचलला. त्यांच्या या कामगिरीचे आनंद महिंद्रा यांनी जोरदार कौतुक केले आहे.
काय आहे आनंद महिंद्रा यांचे नवे ट्विट…
- उद्योगपती आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर जगभरातील घडामोडींवर अनेकदा आपली मते मांडतात.
- आता त्यांनी जपानच्या फुटबॉल संघाचे व्यवस्थापक हाजिमे मोरियासू यांचा एक हृदयस्पर्शी फोटो शेअर केला आहे.
- ज्यांना फिफामध्ये पेनल्टी शूटआऊटममळे क्रोएशियाकडून ३-१ असा पराभव पत्करावा लागल्यानंतर त्यांनी चाहत्यांचे आभार मानले आहेत.
- ते समोर वाकून अभिवादन करताना दिसत आहेत.
ट्वीटला जबरदस्त प्रतिसाद, २० हजारांपेक्षाही जास्त लाईक्स
- हे हृदयस्पर्शी ट्विट शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी लिहिले की, त्याचे वर्णन करण्यासाठी फक्त दोन शब्द आहेत ते म्हणजे डिग्निटी आणि ग्रेस.
- आनंद महिंद्रा यांनी हे ट्विट शेअर केले आणि तेव्हापासून त्याला २०,००० हून अधिक लाईक्स आणि अनेक कमंट्स मिळाल्या आहेत.
- एका युजरने लिहिले की, अतिशय सभ्य वृत्ती.
- दुसऱ्या युजरने लिहिले की, या माणसाचा, त्याच्या संघाचा, त्याच्या देशाचा आणि त्याच्या अखंडतेच्या आणि नम्रतेच्या संस्कृतीबद्दल आदर, आदर आणि अधिक आदर आहे.
कोसियाच्या गोलकीपरची जबरदस्त कामगिरी…
- क्रोएशियाचा गोलकीपर डोमिनिक लिव्हकोविकने फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत जपानविरुद्ध पेनल्टी शूटआऊटमध्ये तीन गोल वाचवले.
- त्याने त्याच्या संघाला अंतिम आठमध्ये नेले.
- सामन्याच्या वेळेत स्कोअर १-१ होता.
- पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाने जपानचा ३-१ असा पराभव केला.
- क्रोएशियाकडून निकोला व्लासिक, मार्सेलो ब्रोझोविच आणि मारियो पासालिच गोल करण्यात यशस्वी ठरले.
- जपानसाठी फक्त ताकुता असानो यांनी गोल केला.