मुक्तपीठ टीम
सांगली जिल्ह्यात खरीप पणन हंगाम २०२२-२०२३ मध्ये किमान आधारभुत किंमत खरेदी योजनेंतर्गत भरडधान्य (ज्वारी बाजरी व मका) खरेदी पुर्व तयारी करीता शासन निर्णयातील तरतुदीनुसार शेतकऱ्यांची एन.ई.एम.एल पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करण्याकरीता दिनांक १५ डिसेंबर २०२२ अखेर पर्यंत केंद्र शासनाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली.
सांगली जिल्ह्यात विष्णु आण्णा ख. वि. संघ, सांगली/जत, कवठेमहांकाळ तालुका ख.वि.संघ, कवठेमहांकाळ, ॲड. आर. आर. पाटील शेतकरी सह ख. वि. संघ, तासगाव, खानापुर तालुका ख. वि. संघ, खानापुर, डॉ. पतंगराव कदम शेतकरी सह. ख. वि. संघ, पलुस, कृषी उत्पन्न बाजार समिती,आटपाडी या सात खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे. नोंदणीसाठी चालु हंगामातील पिक पेरा, ऑनलाईन नोंद असलेला सात बारा उतारा, बँक खात्याच्या पासबुकची साक्षांकित प्रत, आधारकार्ड प्रत तसेच शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक इत्यादी कागदपत्रासह शेतकऱ्यांनी स्वत: हजर राहून पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी दरम्यान लाईव्ह फोटो अपलोड करावयाचे आहेत. चालु हंगामात मका पिकासाठी रक्कम १ हजार ९६२ रूपये आधारभूत किंमत जाहीर झाली असून शेतकऱ्यांनी मुदतीत नोंदणी करावी. मका खरेदी करीता कालावधी दि. १ नोव्हेंबर २०२२ ते ३१ जानेवारी २०२३असा आहे. अधिक माहितीसाठी ०२३३/२६७०८२० व मो. नं ८१०८१८२९४१ वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी सुधीर पाटील यांनी केले आहे.