मुक्तपीठ टीम
केंद्रीय विद्यालय संघटनेत असिस्टंट कमिश्नर, प्रिंसिपल, वाइस प्रिंसिपल, पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, लायब्रेरियन, संगीत प्राथमिक शिक्षक, फायनान्स ऑफिसर, सिव्हिल असिस्टंट इंजिनीअर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, हिंदी ट्रांसलेटर, सिनियर सेक्रेटेरियल असिस्टंट, ज्युनियर सेक्रेटेरियल असिस्टंट, स्टेनोग्राफर ग्रेड-२ या पदांसाठी एकूण ६ हजार ९९० जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २६ डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- १) ४५% गुणांसह पदव्युत्तर पदवी २) बी.एड ३) ०३ वर्षे अनुभव
- पद क्र.२- १) ४५% गुणांसह पदव्युत्तर पदवी २) बी.एड ३) २ ते ८ वर्षांपर्यंत अनुभव
- पद क्र.३- १) ४५% गुणांसह पदव्युत्तर पदवी २) बी.एड ३) २ ते १० वर्षांपर्यंत अनुभव
- पद क्र.४- १) ५०% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी २) बी.एड
- पद क्र.५- १) ५०% गुणांसह संबंधित विषयात पदवी २) बी.एड
- पद क्र.६- लायब्ररी सायन्स पदवी किंवा पदवीसह लायब्ररी सायन्स डिप्लोमा
- पद क्र.७- १) ५०% गुणांसह १०वी उत्तीर्ण २) संगीत विषयात पदवी
- पद क्र.८- ५०% गुणांसह बीकॉम + ४ वर्षे अनुभव किंवा ५०% गुणांसह एमकॉम + ३ वर्षे अनुभव किंवा सीए/ आयसीडब्ल्यूए/ फायनान्स एमबीए/ फायनान्स पीजीडीएम+ ३ वर्षे अनुभव
- पद क्र.९- सिव्हिल इंजिनीअरिंग पदवी + २ वर्षे अनुभव किंवा सिव्हिल इंजिनीअरिंग डिप्लोमा + ५ वर्षे अनुभव
- पद क्र.१०- १) पदवीधर २) यूडीसीचा ३ वर्षे अनुभव
- पद क्र.११- १) इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी २) हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा २ वर्षे अनुभव
- पद क्र.१२- १) पदवीधर २) यूडीसीचा ३ वर्षे अनुभव
- पद क्र.१३- १) पदवीधर २) कौशल्य चाचणी नियम
- पद क्र.१४- १) १२वी उत्तीर्ण २) संगणकावर इंग्रजी टायपिंग येत असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय, पद क्र.१ साठी ५० वर्षांपर्यंत, पद क्र.२- ३५ ते ५० वर्षांपर्यंत, पद क्र.३ साठी ३५ ते ४५ वर्षांपर्यंत, पद क्र.४- ४० वर्षांपर्यंत, पद क्र.५,६,८,९,१०,११ साठी ३५ वर्षांपर्यंत, पद क्र.७ आणि १२ साठी ३० वर्षांपर्यंत, पद क्र.१३ आणि १४ साठी २७ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईएक्सएसएम उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही तर, पद क्र.१ ते ३ साठी २,३०० रूपये, पद क्र. ४ ते ११ साठी १,५०० रूपये, पद क्र. १२ ते १४ साठी १,२०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी केंद्रीय विद्यालय संघटनेच्या अधिकृत वेबसाइट https://kvsangathan.nic.in/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीचे ठिकाण
https://kvsangathan.nic.in/announcement
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1ofrCdPVTb7oD_HarslCFE9A-H5MgDU6Q/view