मुक्तपीठ टीम
टिव्हीएसने भारतात त्यांचे नवीन Apache 2023 RTR 160 4V स्पेशल एडिशन लाँच केले आहे. या बाईकमध्ये कंपनीने अनेक कॉस्मेटिक बदल तसेच फीचर्समध्ये बदल केले आहेत. बाईकला आता नवीन एक्झॉस्ट सेटअप मिळाला आहे आणि आउटगोइंग मॉडेलपेक्षा १ किलोने हलकी बाईक आहे. कंपनीने ही स्पेशल एडिशन बाइक पर्ल व्हाइट कलर ऑप्शनमध्ये लाँच केली आहे.
2023 TVS Apache RTR 160 4V फीचर्स…
- या नवीन बाइकमध्ये काळा आणि लाल रंगाचे स्पोर्टी कॉम्बिनेशन आहे.
- नवीन पॅटर्नसह ड्युअल टोन सीट, अॅडजस्टेबल क्लच आणि ब्रेक लीव्हर, TVS Sports X कनेक्टिव्हिटी, गियर शिफ्ट इंडिकेटर, TM रियर रेडियल टायर मिळेल.
- यात DRLs आणि LED हेडलॅम्प सारखी फिचर्स उपलब्ध आहेत.
- कंपनीने या बाईकमध्ये बुलपप एक्झॉस्ट सिस्टमचा वापर केला आहे.
- या एक्झॉस्ट सिस्टीमच्या वापरामुळे बाईकचे वजन १ किलोने हलके झाले आहे.
- या एक्झॉस्ट सिस्टीममुळे बाइकची एक्झॉस्ट नोटही मोठ्या प्रमाणात बदलली आहे.
- कंपनीने या बाइकमध्ये १५९.७ सीसी इंजिन वापरले आहे.
- हे इंजिन १७.५५ पीएसची पॉवर आणि १४.७३ एनएम चा पीक टॉर्क जनरेट करू शकते.
- कंपनीने हे इंजिन ५-स्पीड गिअरबॉक्ससह पेअर केले आहे.
- या बाईकमध्ये राइडिंग मोडचा सपोर्टही मिळतो.
- यामध्ये अर्बन, स्पोर्ट आणि रेन रायडिंग अशा एकूण तीन मोडमध्ये सादर केली आहे.
- नवीन २०२३ TVS Apache RTR 160 4V स्पेशल एडिशनची किंमत १,३०,०९० रुपये एक्स-शोरूम दिल्ली आहे.