मुक्तपीठ टीम
सीमा सुरक्षा दल हे सर्वात मोठे निमलष्करी दल आहे. १ डिसेंबर रोजी सीमा सुरक्षा दलाला स्थापन हेऊन ५८ वर्षे पूर्ण झाली आहेत. सीमा सुरक्षा दल म्हणजेच BSFवर ६३८६.३६ किमी लांबीच्या सीमेची जबाबदारी आहे. त्यातील २२८९.६६ किमी लांबीची सीमा पाकिस्तानला लागून आहे. बांगलादेशला लागून ४०९६.७० किमी लांबीची सीमा आहे. BSFच्या १९३ बटालियन आहेत. आता या सीमांवर लक्ष ठेवण्यासाठी BSF ५ हजार ५०० कॅमेऱ्यांची फौज सज्ज करत आहे.
पाकिस्तान आणि बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर दक्षता वाढवण्यासाठी आणि घुसखोरीच्या कारवायांवर नजर ठेवण्यासाठी सीमा सुरक्षा दल यावर्षी ५,५०० कॅमेरे बसवणार आहे. याशिवाय पेन टिल्ट झूम कॅमेरा आणि आयआरआयडीएस सारख्या परवडणाऱ्या उपकरणांच्या मदतीने पाळत ठेवणे अधिक मजबूत केले जाईल.
कॅमेरे बसवण्यासाठी ३० कोटींचा निधी!
- सीसूब महासंचालक पंकज कुमार सिंह यांनी बीएसएफच्या स्थापना दिन वार्षिक पत्रकार परिषदेत सांगितले की केंद्र सरकारने नुकतेच कॅमेरे बसवण्यासाठी ३० कोटी रुपये जारी केले आहेत.
- या इंटर-लिंक्ड कॅमेऱ्यांच्या मदतीने सीमेपलीकडून होणार्या कोणत्याही घुसखोरीवर आणि अनुचित कारवायांवर नजर ठेवली जाऊ शकते.
- या प्रकल्पात राजस्थान, पंजाब आणि जम्मू काश्मीरसह सात सीमांच्या ४८४ किलोमीटर लांबीच्या सीमेवरील ६३५ दुर्गम ठिकाणांचा समावेश केला जाईल.
- देशाच्या सीमा सुरक्षित असून त्या अधिक बळकट करण्यासाठी सातत्याने काम केले जात आहे.
- तंत्रज्ञानाच्या विकासाच्या युगात घुसखोरी आणि इतर घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचीही मदत घेतली जात आहे.
- सीमावर्ती भागात १०० ड्रोन तैनात करण्यात आले आहेत.
- आणखी अनेक ड्रोन खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
- ५४६ लांब श्रेणीचे एचटीआय देखील डिसेंबरपर्यंत पोहोचतील.
- दक्षता वाढण्यासही मदत होईल.
बांगलादेश सीमेच्या तस्करीत वाढ!
- पश्चिम आघाडीवर तस्करीच्या घटनांमध्ये घट झाली आहे.
- बांगलादेशला लागून असलेल्या पूर्व सीमेवर अधिक हालचालींमुळे अंमली पदार्थांची तस्करी वाढली आहे.
- दारूऐवजी वापरण्यात येणारे बंदी असलेले सरबत फेन्सीडील व इतर नशेच्या गोळ्या तस्कर पाठवत आहेत.
- ३१ ऑक्टोबरपर्यंत पश्चिम सीमेवर ५१८.२७२ किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
- पूर्व सीमेवर ही संख्या २५,९५१.६७१ किलो होती.
- घुसखोरीही पूर्व सीमेवर अधिक होती.
- पश्चिम सीमेवर १८२ तर पूर्व सीमेवर ३९९२ जणांना अटक करण्यात आली.
- हे रोखण्यासाठी बांगलादेशवर घुसखोरी अलार्म यंत्रणा बसवण्यात आली आहे.
परेडमध्ये उंटावर महिला प्रथमच!
- रॅगिंग डे परेडनंतर जानेवारीमध्ये होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये प्रथमच महिला उंटांच्या ताफ्यात दिसणार आहेत.
- गेल्या वर्षी जैसलमेर नंतर, यावेळी ४ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता अमृतसर येथील गुरु नानक देव विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये रायझिंग डे परेड होणार आहे.
- यामध्ये प्रथमच बीएसएफच्या एअर डायव्हिंग टीमची कामगिरी हे मुख्य आकर्षण असेल.
- गृह राज्यमंत्री नित्यानंद राय हे प्रमुख पाहुणे असतील.