मुक्तपीठ टीम
येत्या काळात भारतीय दुचाकी बाजारात एक जबरदस्त नवीन बाईक पाहायला मिळणार आहे. देशातील सर्वात मोठी दुचाकी निर्माता कंपनी हिरो मोटोकॉर्प आणि प्रीमियम क्रूझर बाईक निर्माता कंपनी हार्ले एकत्रितपणे ही बाईक बनवणार आहेत. ही बाईक १६० सीसीृपेक्षा जास्त क्षमतेच्या इंजिनसह येईल आणि प्रीमियम सेगमेंटची बाइक असेल.
हिरो मोटोकॉर्प आणि हार्ले-डेव्हिडसन यांनी संयुक्तपणे विकसित केलेली ही जबरदस्त बाईक येत्या दोन वर्षांत भारतात झळकणार आहे. हिरो मोटोकॉर्पचे मुख्य वित्तीय अधिकारी निरंजन गुप्ता यांनी याबाबत ही माहिती दिली आहे. प्रीमियम सेगमेंटमध्ये आपले स्थान मजबूत करण्याच्या हिरो मोटोकॉर्पच्या योजनेचा हा एक भाग आहे.
देशातील सर्वात मोठी दुचाकी कंपनी आपल्या विक्रीचे प्रमाण आणि नफा वाढवण्यासाठी १६० सीसी आणि त्याहून अधिक मॉडेल आणण्याच्या तयारीत आहे. हिरो मोटोकॉर्प १००-११० सीसी सेगमेंटमध्ये आधीच आघाडीवर आहे. पुढील दोन वर्षात, असे मॉडेल्स दिसतील जे प्रीमियम सेगमेंट ड्रायव्हिंग व्हॉल्यूममध्ये तसेच नफ्यात असतील.
ऑक्टोबर २०२०मध्येच हिरो मोटोकॉर्प आणि अमेरिकन ब्रँड हार्ले डेव्हिडसनची भागीदारीची घोषणा!
- कंपनी प्रीमियम उत्पादनांचे या विभागात नवीन मॉडेल लॉंच करेल.
- यामुळे प्रिमियम सेगमेंटमध्ये बाजारातील हिस्सा वाढेल आणि त्यांचा नफाही वाढेल.
- हिरो मोटोकॉर्प आणि अमेरिकन ब्रँड हार्ले डेव्हिडसन यांनी ऑक्टोबर २०२० मध्ये भारतीय बाजारपेठेसाठी भागीदारीची घोषणा केली होती.
- या भागीदारी अंतर्गत, हिरो मोटोकॉर्प देशात हार्ले-डेव्हिडसन ब्रँड नावाखाली प्रीमियम मोटरसायकलींची रेंज विकसित आणि विकणार आहे.