मुक्तपीठ टीम
गेल्या अनेक वर्षांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या लालू प्रसाद यांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांच्या मुलीने एक मोठा निर्णय घेतला आहे. जे सर्व मुलींसाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे. लालू प्रसाद यांची मुलगी, रोहिणी आचार्य यांनी वडिलांना किडनी दान करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून ते या आजारातून लवकर बरे होतील. लालूंना ५६हून अधिक प्रकारच्या आजारांनी ग्रासले आहे, ज्यासाठी ते उपचारासाठी सिंगापूरला गेले आहेत.
किडनी दात्या लेकीचं ट्विटरवर शंकेखोरांना इमोशनल उत्तर!
- लालू प्रसाद यांची कन्या रोहिणी आचार्य यांनी मंगळवारी एक भावनिक ट्विट केले आहे.
- वडिलांना किडनी देण्यास तयार, रोहिणीने ट्विटरवर म्हटले आहे की, आम्ही किडनी विकत घेणारे लोक नाही.
- आम्ही सर्वस्व पित्याला अर्पण करणारे लोक आहोत.
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर कोणीतरी लालू यादव यांना किडनी विकत घेऊन प्रत्यारोपण करण्याबाबत वक्तव्य केले होते. यावर रोहिणीने साधेपणाने उत्तर दिले. ट्विट करून टीकाकारांना प्रत्युत्तर देताना रोहिणी म्हणाली होती की, “एखाद्याच्या बलिदानाची खिल्ली उडवणे हे माणसाचे काम नसून मानवतेच्या भुकेलेल्या लांडग्यांचे काम आहे’. कोणत्याही अनियंत्रित अफवांवर जाऊ नका.”
लालूंना ३ डिसेंबरला रुग्णालयात दाखल करण्यात येण्याची शक्यता
- सिंगापूरला पोहोचलेले आरजेडी पक्षाचे प्रमुख लालू प्रसाद यांना ३ डिसेंबरला तिथल्या रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.
- त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
- नॉर्मल रिपोर्ट आल्यावर ३ डिसेंबरनंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून किडनी प्रत्यारोपण करण्यात येईल.
- मिळालेल्या माहितीनुसार, ५ डिसेंबरला लालू यादव यांचे ऑपरेशन होऊ शकते. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही.