मुक्तपीठ टीम
आज अचानक देशभरात रिलायन्स जियोच्या सेवा बंद झाल्या आहेत. सेवा बंद असल्याने, युजर्सना कोणालाही कॉल करता येत नव्हता किंवा एसएमएस पाठवता येत नव्हता. सेवा बंद असल्याने इंटरनेट किंवा डेटा वापरावर कोणताही परिणाम झालेला नाही. जिओ सेवा ठप्प झाल्यामुळे अनेक युजर्सनी सोशल मीडिया साईट्सवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. मात्र ही सेवा सर्व युजर्ससाठी बंद झालेल्या नव्हती. अनेक युजर्सना अद्यापही कोणत्याही अडचणीशिवाय सेवांचा लाभ घेता येत आहे.
यूजर्सचा सोशल मीडिया साइट्सवर क्रोध!!
- सेवा बंद झाल्यामुळे युजर्स सोशल मीडिया साइट्सकडे वळले.
- अनेक युजर्सनी सोशल मीडिया साइट्सवर राग व्यक्त केला.
- ट्विटरवर #JioDown चा टॅग वापरत युजर्स तक्रार करत आहेत.
- युजर्सच्या स्मार्टफोनवर VoLTE चिन्ह दिसत नव्हता.
- आज सकाळपासून जिओच्या सेवा बंद आहेत.
- त्यामुळे यूजर्स कॉलिंग आणि मेसेजिंगचा वापर करू शकत नाहीत.
- अद्याप यूजर्सनी इंटरनेटशी संबंधित समस्यांचा उल्लेख केलेला नाही.
- यूजर्सना फक्त कॉलिंग आणि एसएमएसमध्ये त्रास होत आहे.
- यावर अजून कंपनीने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.