मुक्तपीठ टीम
केंद्रीय एजन्सी ईडी आणि आयकर यांच्या चौकशीवर प्रश्न उपस्थित करत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी ट्विटच्या मालिकेत केंद्रीय एजन्सी छापे आणि चौकशीच्या नावाखाली छत्तीसगडमधील लोकांचा छळ करत असल्याचा आरोप केला आहे. बघेल म्हणाले की केंद्रीय एजन्सी ही देशातील लोकांची ताकद आहे आणि जर लोक या एजन्सींना घाबरत असतील तर ही नकारात्मक शक्ती देशाला कमकुवत करत आहे.
ईडी आणि इन्कम टॅक्सच्या कायदेशीर कारवाईचे स्वागत करतो – भूपेश बघेल
“ईडी आणि आयकर (आयटी) सारख्या एजन्सींनी भ्रष्टाचारात गुंतलेल्यांवर कायदेशीर कारवाई केली पाहिजे, आम्ही त्याचे स्वागत करतो, परंतु ईडी आणि आयटीच्या तपासादरम्यान ज्या प्रकारे बेकायदेशीर कारवाया समोर येत आहेत, ते अजिबात मान्य नाही,”
नागरिकांच्या सुरक्षेसाठी आम्ही वचनबद्ध – भूपेश बघेल
- गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात ईडीचे छापे पडत आहेत.
- ऑक्टोबरमध्ये, राज्यात छापे टाकल्यानंतर ईडीने आय ए एस अधिकारी समीर बिस्नोई आणि इतरांना अटक केली.
- ईडीने एका निवेदनात दावा केला होता की छत्तीसगडमध्ये कोळसा वाहतुकीत एक “मोठा घोटाळा” होत आहे.
- कोणाची चौकशी केली जात आहे, त्याची व्हिडिओग्राफी झाली पाहिजे.
- कायदेशीर तपासात पूर्ण सहकार्य मिळेल.
- यापुढेही अशा तक्रारी आल्यास राज्य पोलिसांना कायदेशीर कारवाई करण्यास भाग पाडले जाईल.
- नागरिकांच्या सुरक्षेसाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांना ईडी आणि आयटी विरोधात सामान्यांच्या तक्रारी!…
- लोकांना बोलावून त्यांना घरातून उचलून नेणे.
- लोकांना मारहाण करून कबुलीजबाब देण्यास भाग पाडणे.
- त्यांना जन्मठेपेपर्यंत तुरुंगात डांबण्याची धमकी देणे.
- रात्री उशिरापर्यंत त्यांना अन्न-पाण्याविना ठेवणे.
- स्थानिक पोलिसांना माहिती न देता सीआरपीएफला सोबत घेऊन छापे टाकत आहेत.
- काहींना रॉडने मारहाण होत आहे.
- काहींचे पाय तुटले आहेत.
- काहींचे श्रवणशक्ती कमी झाल्याच्या तक्रारी अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाल्या आहेत.
- अशा अनेक तक्रारी लोक त्यांच्याकडे करत आहेत.
या घटनेमुळे राज्यातील जनता प्रचंड संतापली आहे. राजकीय षड्यंत्र पूर्ण करण्यासाठी खोटे खटले उभे करण्याचा खेळ खेळला जात आहे. अधिकाऱ्यांना या घटनांबद्दल भारत सरकारला माहिती देण्याचे आणि बेकायदेशीर कृत्ये थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.