मुक्तपीठ टीम
आधार कार्ड ही भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची सर्वात मोठी ओळख आहे. आधार आज प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे. आता जवळपास प्रत्येक महत्त्वाच्या कामासाठी आधार अनिवार्य झाले आहे. त्यामुळे, वेळोवेळी आधारची पडताळणी युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या डेटाबेसमधून करावी.
यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच यूआयडीएआयने सर्व राज्य सरकार आणि युनिट्सना आधार कार्ड घेताना त्याची पडताळणी करण्यास सांगितले आहे.
यूआयडीएआयने म्हटले आहे की, “गैरवापर टाळण्यासाठी आधार हे भौतिक किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात स्वीकारण्यापूर्वी त्याची पडताळणी करावी. असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.”
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने म्हटले आहे की, आधार कार्ड, ई-आधार, आधार पीव्हीसी कार्ड आणि एम-आधार यांची पडताळणी आधार धारकाच्या संमतीनंतर केली पाहिजे. वापरण्यापूर्वी पडताळणीच्या गरजेवर जोर देऊन
यूआयडीएआयने राज्य सरकारांना आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याचे आवाहन केले आहे, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. यूआयडीएआयने एक परिपत्रक देखील जारी केले आहे ज्यात पडताळणी आणि प्रोटोकॉलचे पालन करण्याची आवश्यकता आहे. असे सांगितले आहे.