मुक्तपीठ टीम
ई-कार बनवणाऱ्या टेस्लाचे नाव सर्वात मोठ्या टेक कंपन्यांमध्ये येते. टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांचे नवकल्पनांवर प्रेम कोणापासून लपलेले नाही. त्यांनी नुकतंच ट्विटर ताब्यात घेतलं आहे. पण त्यांच्या अचाट-अफाट बदलांमुळे ट्विटरवर टीकाही होऊ लागली आहे. काही जाहिरातदार मागे फिरले तर आता नवं संकट समोर आलं आहे. गुगल प्लेस्टोर म्हणजे अँड्राइड आणि अॅपल स्टोर म्हणजे आयफोनवरून ट्विटर काढले जाण्याची चर्चा आहे. तसं झालं तर इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करणारी मस्क यांची टेस्ला कंपनी लवकरच स्मार्टफोन बाजारात उतरणार असल्याची चर्चा आहे.
टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी म्हटलं आहे की, अॅपल आणि गुगलद्वारे ट्विटरला अॅप स्टोअरमधून काढून टाकल्यास ते पर्यायी स्मार्टफोन तयार करतील. अॅपल आणि अँड्रॉइड उत्पादनांशी स्पर्धा करण्यासाठी हा स्मार्टफोन बनवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ट्विटरला सध्या अॅपल आणि गुगलच्या अॅप स्टोअर्सकडून तीव्र तपासणीचा सामना करावा लागत आहे. मस्क चिंतित आहे की ट्विटर दोन्ही अॅप स्टोअरमधून काढून टाकले जाऊ शकते.
‘मी पर्यायी फोन करीन’- एलॉन मस्क
- हे प्रकरण तेव्हा सुरू झाले जेव्हा एका ट्विटर यूजरने लिहिले, ‘जर अॅपल आणि गुगलने त्यांच्या अॅप स्टोअरमधून ट्विटर काढून टाकले तर एलॉन मस्क यांनी स्वतःचा स्मार्टफोन बनवावा.’
- याच्या उत्तरात मस्क यांनी लिहिले की, ‘मी नक्कीच आशा करतो की असे होणार नाही. पण हो, दुसरा पर्याय नसेल तर पर्यायी फोन करेन.
टेस्ला स्मार्टफोनबाबत यूजर्सच्या प्रतिक्रिया
- मस्क यांच्या ट्विटवर अनेक ट्विटर युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या.
- एका यूजरने लिहिले, मला खात्री आहे की मस्क स्मार्टफोन क्षेत्रात क्रांती घडवून आणेल.
- आणखी एका यूजरने लिहिले की, ‘मला वाटते की तो अशा योजनेवर आधीपासूनच काम करत आहे.’