Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

तुमच्या नावावर किती मोबाईल नंबर? या पोर्टलवर जाणून घ्या…धोका टाळा!

September 5, 2026
in उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं
0
TAFCOP-Portal

मुक्तपीठ टीम

आजच्या काळात जवळ जवळ प्रत्येकाकडे मोबाईल फोन आहे. पण एकापेक्षा जास्त मोबाईल नंबर असणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. अनेकांकडे दोन किंवा त्यापेक्षा जास्त मोबाईल नंबर असतात. आज बहुतेक मोबाईल ड्युअल सिमचे आहेत, ज्यामुळे लोक एकाच फोनमध्ये २ सिम वापरतात. त्यात पुन्हा १८ वर्षांखाली मुलांच्या नावावर सिम जारी करता येत नासल्यामुळे प्रत्येक पालक मुलांना स्वतःच्या नावावर सिम देतात. गेल्या काही वर्षांत, भारतात अनधिकृत सिमची वाढती प्रकरणे कार्डधारक आणि सरकारी अधिकारी या दोघांसाठी डोकेदुखी बनली आहेत. त्यामुळे आपल्या नावावर नेमकी किती सिम कार्ड जारी झाली आहेत, हे जाणून घेणं आवश्यक आहे.

आता पोर्टलद्वारे तपासा एका फोननंबरवर किती मोबाइल नंबर सक्रिय…

  • दूरसंचार विभाग आणि भारत सरकार ने एक पोर्टल tafcop.dgtelecom.gov.in लाँच केले आहे.
  • पोर्टल कोणत्याही व्यक्तींना त्यांच्या परवानगीशिवाय किंवा माहितीशिवाय त्यांच्या नावावर कोण मोबाइल नंबर वापरत असल्याची तपासणी करण्यास परवानगी देते.
  • युजर्सना या पोर्टलवर त्यांच्या नावाने जारी केलेले क्रमांक ब्लॉक करण्याची सुविधाही मिळेल.

तुमचा नंबर कसा तपासायचा…

  • सर्वप्रथम युजर्स पोर्टलवर लॉग इन करा.
  • तुमचा नंबर टाकल्यानंतर प्राप्त झालेला OTP टाका.
  • यानंतर DOT त्यांच्या नावावर किती सक्रिय कनेक्शन्स आहेत याची माहिती एसएमएसद्वारे देईल.
  • विभाग युजर्सना अलर्ट करेल की जे नंबर युजर्सद्वारे वापरात नाहीत किंवा अनधिकृत आहेत, ते युजर्सच्या विनंतीनुसार ब्लॉक केले जाऊ शकतात.
  • या विनंत्यांचा मागोवा घेण्यासाठी विभाग युजर्सना तिकीट आयडी देखील देईल.

एक व्यक्ती किती सिम चालवू शकते?

  • सरकारच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, भारतातील एका व्यक्तीला फक्त ९ मोबाईल नंबर कनेक्शन दिले जाऊ शकतात.
  • ९ पेक्षा जास्त मोबाईल नंबर कोणाला दिले तर ते मार्गदर्शक तत्वाच्या विरोधात असेल.
  • सरकार या पोर्टलच्या माध्यमातून हा धोका रोखण्यासाठी काम करत आहे.
  • eSIM लक्षात घेऊन, सरकारने २०१८ मध्ये केवळ eSIM साठी ही संख्या प्रति व्यक्ती ९ सिमवरून १८ सिमपर्यंत वाढवली आहे.
  • eSIM सह, युजर्सला टेलिकॉम कंपनी बदलताना किंवा नवीन कनेक्शन खरेदी करताना देखील सिम बदलण्याची गरज नाही.
  • सामान्य सिमच्या विपरीत, eSIM युजर्सच्या डिव्हाइसमध्येच स्थापित केले जाते.
  • यामध्ये टेलिकॉम कंपनीचे तपशील अपडेट होतात.
  • मोबाइल २ मोबाईल (M2M) संवादासाठी ९ सिम घेतले जाऊ शकतात.

Tags: DOTIndiaMobile NumberSimCardTAFCOP Portalदूरसंचार विभागभारत सरकार
Previous Post

अमिताभ बच्चन यांनी वडिलांना विचारलेलं, “तुम्ही मला जन्म का दिलात?”

Next Post

…तर एलॉन मस्क बनवणार ‘टेस्ला’ स्मार्ट फोन!

Next Post
Tesla Smart Phone

...तर एलॉन मस्क बनवणार 'टेस्ला' स्मार्ट फोन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!