Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्रात दुग्ध उत्पादनातील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करण्याची डेन्मार्कच्या राजदुतांची घोषणा

November 24, 2022
in featured, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Ambassador of Denmark

मुक्तपीठ टीम

डेन्मार्क हा जगातील आघाडीचा दुग्ध उत्पादक देश असून आपल्या देशाने भारताला दुग्ध क्रांती घडवून आणण्यात मदत केली आहे. डेन्मार्क भारतातील अनेक राज्यांना कृषी व पर्यावरण संवर्धन क्षेत्रात सहकार्य करीत असून लवकरच महाराष्ट्रात दुग्ध उत्पादनातील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करणार असल्याची माहिती डेन्मार्कचे भारतातील राजदूत फ्रेडी स्वेन यांनी आज येथे दिली. फ्रेडी स्वेन यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.

स्वेन म्हणाले, जगातील सर्वात मोठी जहाज व लॉजिस्टिक कंपनी मर्स्क, लार्सन अँड टुब्रो यांसह ३० डॅनिश कंपनी भारतात कार्य करीत असून स्वच्छ ऊर्जा व कार्बन उत्सर्जन कमी करणे या कार्यात तांत्रिक सहकार्य करीत आहे. डेन्मार्क तामिळनाडूमध्ये ‘विंड पार्क’ स्थापन करीत असून भारतातील शेतकऱ्यांना उद्योजक बनवण्याच्या दृष्टीने देखील सहकार्य करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

कोरोना संसर्गाच्या काळात भारताने डेन्मार्कसह अनेक देशांना करोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी भारताप्रती कृतज्ञता व्यक्त केली. भारत एक जिवंत संस्कृती असून गेल्या काही वर्षात भारत एक स्वाभिमानी डिजिटल महासत्ता म्हणून उदयाला आला आहे असे त्यांनी सांगितले.

राजदूत फ्रेडी स्वेन यांचे राज्यात स्वागत करताना डेन्मार्क व महाराष्ट्रातील सहकार्य अधिक वृद्धिंगत होण्यासाठी आपण व्यक्तिशः लक्ष देऊ, असे आश्वासन राज्यपालांनी यावेळी दिले. बैठकीला डेन्मार्कचे व्यापार व वाणिज्य प्रमुख सोरेन कॅनिक मारकार्डसेन तसेच डेन्मार्कचे मुंबईतील उप-वाणिज्यदूत हेन्री करकाडा उपस्थित होते.


Tags: Ambassador of DenmarkCenter of ExcellenceDairy Productiongood newsgovernor bhagat singh koshyariMaharashtramuktpeethघडलं-बिघडलंचांगली बातमीडेन्मार्कच्या राजदुतदुग्ध उत्पादनमहाराष्ट्रमुक्तपीठराज्यपाल भगत सिंह कोश्यारीसेंटर ऑफ एक्सलन्स
Previous Post

कर्नाटक सीमाप्रश्न पुन्हा तापणार? जत तालुक्यावर मुख्यमंत्री बोम्मई यांचा दावा

Next Post

दिल्लीच्या महाराष्ट्र परिचय केंद्रातील ग्रंथालयात ‘दिवाळी अंकांचं प्रदर्शन

Next Post
Delhi anka

दिल्लीच्या महाराष्ट्र परिचय केंद्रातील ग्रंथालयात ‘दिवाळी अंकांचं प्रदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!